शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

हवाईसुंदरीला कॉकपिटमध्ये बसविणे अंगलट

By admin | Updated: April 24, 2016 04:11 IST

एका आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान हवाई सुंदरीला आपल्यासोबत कॉकपिटमध्ये बळजबरीने बसविणाऱ्या वैमानिकाची स्पाईसजेटने हकालपट्टी केली आहे. आरोपी वैमानिकाने सदर

नवी दिल्ली : एका आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान हवाई सुंदरीला आपल्यासोबत कॉकपिटमध्ये बळजबरीने बसविणाऱ्या वैमानिकाची स्पाईसजेटने हकालपट्टी केली आहे. आरोपी वैमानिकाने सदर हवाईसुंदरीला केवळ कॉकपिटमधील आपल्या आसनावरच बसविले नाही तर सहवैमानिकांना कॉकपिटबाहेरही काढले होते. बराच वेळ वैमानिक आणि हवाईसुंदरी कॉकपिटमध्ये एकटेच होते.गेल्या २८ फेब्रुवारीला कोलकाता येथून बँकॉकला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. अखेर दोन महिन्यांनंतर स्पाईसजेटने त्या वैमानिकाला बडतर्फ केले.कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला कॉकपिटमध्ये पायलटच्या जागी बसविणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते. त्याचप्रमाणे विमानात हवाई सुंदरीचे शारीरिक शोषण हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे. या महाभाग वैमानिकाने त्याच दिवशी रात्री परत येतानाही ही लज्जास्पद वर्तणूक केली होती. आरोपी वैमानिकाने मुख्य हवाई सुंदरीशी बोलताना चुकीची भाषा वापरली नसती तर कदाचित हे प्रकरण उघडही झाले नसते. पीडित हवाई सुंदरीने यासंदर्भात एअरलाईन्सकडे तक्रार केली. त्यानंतर स्पाईसजेटने अंतर्गत चौकशी करून नागरी उड्डयण महासंचालनालयाला याबाबत माहिती दिली. या वैमानिकाला बडतर्फ करण्याचा निर्णय स्पाईसजेटचे अध्यक्ष अजयसिंग यांनी स्वत: घेतला असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली असून आरोपी वैमानिकाची एवढ्यावरच सुटका होणार नाही असे संकेत आहेत. डीजीसीएचे प्रमुख एम. साथियावथी यावर लक्ष ठेवून आहेत. या वैमानिकाविरुद्ध आरोप सिद्ध झाल्यास त्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)