मेनलीड-वीज दरवाढीचा शॉक-
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
घरगुती वीज ग्राहकांना
मेनलीड-वीज दरवाढीचा शॉक-
घरगुती वीज ग्राहकांनादरवाढीचा शॉक!- औद्योगिक, कृषी ग्राहकांना४८९ कोटींची सबसिडीयदु जोशीनागपूर - चालू महिन्याच्या सुरुवातीला औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांची मासिक ६१४ कोटी रुपयांची सबसिडी काढून घेत भाजपा-शिवसेना युती सरकारने ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या माथी २० टक्के दरवाढीचा बोजा पडणार आहे. मात्र त्याचवेळी औद्योगिक व कृषी वीज ग्राहकांना ४८९ कोटी रुपयांची सबसिडी देऊन किमान एक महिना तरी वीजदरवाढीपासून वाचविले आहे. वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) गेल्या मार्चमध्ये लागू केलेल्या २० टक्के वीज दरवाढीचा फटका औद्योगिक आणि ३०० युनिटपर्यंत वापर करणार्या घरगुती ग्राहकांना बसू नये म्हणून राज्य शासनाने ७०६कोटी रुपयांची मासिक सबसिडी महावितरणाला दिली होती. त्यात ९२ कोटी रुपयांच्या कृषी सबसिडीचादेखील समावेश होता. सरकारने महावितरणकडे मासिक ७०६ कोटी रुपये भरायचे आणि वरील वीज ग्राहकांना दिलासा द्यायचा, असा हा निर्णय आधीच्या आघाडी सरकारने घेतला होता. मात्र ऑगस्टपासून सबसिडीची रक्कम राज्य शासनाने न भरल्याने महावितरणने त्यासाठी तगादा लावला होता. भाजपाचे नवे सरकार सत्तेत आल्यानंतर ही सबसिडी काढून घेण्याची भाषा सुरू झाली होती. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ही सबसिडी परवडणारी नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे ६ डिसेंबरला एक आदेश काढून ९२ कोटींची कृषी सबसिडी कायम ठेवत ६१४ कोटी रुपयांची सबसिडी रद्द करण्यात आली होती. तथापि, राज्य मंत्रिमंडळाने आज याबाबत निर्णय घेताना कृषी पंपांना एक महिन्यासाठी ९२ कोटी रुपयांची तर औद्योगिक वीज ग्राहकांना एक महिन्यासाठी ३९७ कोटी अशी ४८९ कोटी रुपयांची सबसिडी एक महिन्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. ुुुुुु-------------------------------अशी असेल वीज दरवाढ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापर करणार्या ग्राहकांना आता ४.१६ रु.प्रति युनिट दराने तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणार्या ग्राहकांना ७.४२ रु.दराने वीज मिळेल. आधी हा दर सबसिडीमुळे अनुक्रमे ३.३६ रु. आणि ६.०५ रु. इतका होता. औद्योगिकमध्ये एक्स्प्रेस फीडर वीज ७.०१ रु. आणि नॉन एक्स्प्रेस फिडरवर ६.३३ रु.युनिटने वीज मिळेल. सबसिडी हटविली असती तर हे दर अनुक्रमे ८.६१ रु. आणि ७.८३ रु. युनिट असे राहिले असते. वाणिज्यिक वापराच्या विजेत औद्योगिक विजेचे दर १० रु.युनिट तर एक्सप्रेस फिडरवर विजेचे दर ९.८३ रु.युनिट असेल. सबसिडी काढून घेतली असती तर हे दर अनुक्रमे १२.६६ रु. आणि १२.११ रु.युनिट असे राहिले असते.-------------------------------