शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण, तलाठी कार्यालयांत हेलपाटे

By admin | Updated: November 15, 2015 21:13 IST

अवसरी : आंबेगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनी व महसूल विभागाकडून सर्वसामान्य जनतेची कामे हेलपाटे मारून देखील होत नसल्याने तालुक्यातील प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अवसरी : आंबेगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनी व महसूल विभागाकडून सर्वसामान्य जनतेची कामे हेलपाटे मारून देखील होत नसल्याने तालुक्यातील प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये लोकसंख्या वाढल्याने गावागावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ नवीन घरे बांधत आहेत. विहिरी व बोअरवेल घेतली आहे. घरांसाठी, विहिरींसाठी विद्युत वितरण कंपनीकडे विद्युत पुरवठ्यासाठी सहा-सहा महिने अर्ज करूनही वीजजोड मिळत नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असे लोक अधिकार्‍यांना टेबलाखालून पैसे देऊन वीजजोड घेतात. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा ग्राहकांना सहा-सहा महिने हेलपाटे मारून देखील वीजजोड मिळत नाही. विद्युत वितरण कंपनीने नेमलेले ठेकेदार हे अधिकार्‍यांना जुमानत नसल्याने सर्वसामान्यांची कामे वेळेत होत नाहीत. जे ग्राहक जास्त पैसे देतील त्यांची कामे आठ दिवसांत होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यात महसूल विभागाची अशीच परिस्थिती असून हक्कसोड पत्र, वारसहक्क नोंद, जमीन खरेदी-विक्री यांची नोंद करण्यासाठी ४ ते ५ महिने तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून देखील तलाठी दखल घेत नाहीत. अर्जदाराने तलाठ्याला विचारले असता, मंडलाधिकारी सही करत नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. मंचर, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव आदी गावांतील गावामध्ये एजंटशिवाय सर्वसामान्यांची कामे होत नाही. मात्र वरील गावातील राजकीय पुढार्‍यांची कामे बिनापैशात एकाच दिवसात होत आहेत. तहसील कार्यालयात सहा महिन्यांपूर्वी नवीन रेशनकार्ड मिळण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी अर्ज केले. मात्र तहसील कार्यालयात रेशनकार्ड उपलब्ध नसल्याने घोडेगाव तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.
तालुक्यात विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असे नेते असताना देखील सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रशासकीय अधिकार्‍यांकडून होत नाही.