शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधीजींच्या मुलाने केला होता बलात्कार

By admin | Updated: May 15, 2014 10:12 IST

महात्मा गांधीे यांचे ज्येष्ठ पूत्र हरिलाल यांनी स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लंडन : महात्मा गांधीे यांचे ज्येष्ठ पूत्र हरिलाल यांनी स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महात्मा गांधींनी हरिलाल यांना लिहीलेल्या पत्रातून ही माहिती उघडकीस आली आहे. 

महात्मा गांधीजींनी त्यांचा ज्येष्ठ पुत्र हरिलाल याला लिहिलेल्या तीन पत्रांचा लिलाव इंग्लंडमध्ये पुढच्या आठवड्यात होत आहे. जून १९३५ मध्ये ही पत्रे लिहिली असून, त्यात हरिलाल यांच्या वागण्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मुलॉक लिलाव कंपनीतर्फे त्यांची विक्री होत असून, त्यातून ५० ते ६० हजार पौंड मिळतील असे अपेक्षित आहे. हरिलाल यांच्या वर्तणुकीबद्दल गांधीजींना आक्षेप होता. तुझी समस्या माझ्यासाठी अधिकच अवघड झाली आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. मनू तुझ्याबद्दल अनेक भयंकर गोष्टी मला सांगत आहे. आठ वर्षापूर्वी तू तिच्यावर बलात्कार केलास, त्यानंतर तिला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले असे तिने सांगितले.

मनू ही हरिलाल यांची मुलगी होती. ती साबरमती आश्रमात गांधीजींबरोबर राहत असे. ही पत्रे गुजराती भाषेत लिहिली असून, ती चांगल्या स्थितीत आहेत. गांधीजींच्या कुटुंबियांकडूनच ती सध्याच्या मालकाकडे आलेली आहेत. गांधीजी व त्यांचा मुलगा हरिलाल यांच्यातील नात्यासंदर्भात अशी माहिती याआधी बाहेर आली नव्हती. ही माहिती नवी आहे असे मुलॉकने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. २२ मे रोजी लुडलो रेसकोर्स येथे या पत्रांचा लिलाव होणार आहे. (वृत्तसंस्था)

पाश्चिमात्य शिक्षण घेण्यास मुलाला केला विरोध

> हरिलाल याला इंग्लंडला जायचे होते व पित्याप्रमाणे बॅरिस्टर व्हायचे होते; पण महात्मा गांधीजींनी त्याला पाश्चिमात्य शिक्षण घेण्यास विरोध केला.

> त्यामुळे १९११ साली त्याने कुटुंबाशी संबंध तोडले होते. आयुष्यभर त्याचे वडिलांशी दुराव्याचेच नाते राहिले.