शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांत शेती क्षेत्रात महाराष्ट्राची घसरण

By admin | Updated: March 21, 2016 02:49 IST

महाराष्ट्रात गत दहा वर्षांत शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, तर मध्यप्रदेश शेतीच्या लागवडीबाबत आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीमहाराष्ट्रात गत दहा वर्षांत शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, तर मध्यप्रदेश शेतीच्या लागवडीबाबत आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. महाराष्ट्रात लागवडीखालील क्षेत्रात १३ लाख हेक्टरची घट झाली आहे. २०१४-१५ पर्यंत गत दहा वर्षांत ही घसरण झाली आहे. लागवडीखालील क्षेत्र १.२७ कोटी हेक्टरवरून १.१४ कोटी हेक्टर झाले आहे. गुजरातमध्येही गत दहा वर्षांत शेती क्षेत्रात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. लागवडीखालील क्षेत्र ३९.६७ लाख हेक्टरवरून ३५.२७ लाख हेक्टर झाले आहे. शेतीच्या क्षेत्रात घसरण झालेल्या अन्य राज्यांत प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि केरळ यांचा समावेश आहे. परंतु महाराष्ट्रातील शेतीतील घसरण अधिक आहे. सरकार या उत्पन्नाबाबत समाधानी आहे. कारण, देशभरातील लागवडीखालील क्षेत्र हे समाधानकारक आहे. त्यात मोठी घसरण झालेली नाही. देशभरात यंदा पावसाने पाहिजे तशी साथ दिलेली नसतानाही उत्पन्न समाधानकारक असल्याने कृषी मंत्रालय उत्साहित आहे. दरम्यान, देशात दरवर्षी २० ते २५ हजार हेक्टर लागवडीखालील जमीन ही विना लागवडीखाली जाते. याबाबत सरकारने चिंता व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जमिनीचा वापर होत आहे. अशा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिली जात आहे.