शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र समिती-संविधान मोर्चा एकत्र

By admin | Updated: September 24, 2014 02:50 IST

महायुती आणि आघाडी सरकारला पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडी म्हणून महाराष्ट्र डावी लोकशाही आघाडी समितीसोबत संविधान मोर्चाने एकत्र येत महाराष्ट्र समिती-संविधान मोर्चा ही नवी आघाडी स्थापन केली आहे.

मुंबई : महायुती आणि आघाडी सरकारला पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडी म्हणून महाराष्ट्र डावी लोकशाही आघाडी समितीसोबत संविधान मोर्चाने एकत्र येत महाराष्ट्र समिती-संविधान मोर्चा ही नवी आघाडी स्थापन केली आहे. राज्यातील २८८ जागा लढण्याचा निर्धार केलेल्या या आघाडीने सोमवारी रात्री झालेल्या चर्चेनंतर आज १२४ जागांची घोषणा केली.महाराष्ट्र डावी लोकशाही आघाडी समितीत शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर), रिपाइं (आरके), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना यांचा समावेश आहे. तर संविधान मोर्चामध्ये रिपब्लिकन सेना, रिपाइं (खोब्रागडे), शिवराज्य पक्ष, लोकशासन आंदोलन पक्ष, देश बचाव पार्टी या पक्षांसह ओबीसी सेवा संघ, ओबीसी आरक्षण बचाव या संघटनांचा समावेश आहे.तरी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या समावेशासाठी चर्चा सुरू असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. तरी काही जागा त्यांच्यासाठी सोडण्याची तयारीही आघाडीने दाखवल्याचे त्यांनी सांगितले. आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार आणि गेल्या आठ दिवसांपासून महायुतीत जागा वाटप व सत्तेसाठी चाललेली आदळआपट जनतेने पाहिली आहे. त्यामुळे राज्याला तिसरा पर्याय म्हणून पुरोगामी विचारांची तिसरी आघाडी स्थापन केल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, २६ सप्टेंबरला अलिबाग येथे राष्ट्रीय नेते शरद यादव यांना स्टार प्रचारक म्हणून आमंत्रित केल्याचे पाटील यांनी सांगितले.संविधान मोर्चा व महाराष्ट्र समिती हे सत्तेसाठी एकत्र आले नसून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आल्याचे लोकशासन आंदोलन पक्षाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे लोकशाही आंदोलन पक्षाला एकही जागा मिळाली नाही, तरी आघाडीत राहण्याची तयारी कोळसे-पाटील यांनी दर्शवली. (प्रतिनिधी)