शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पत्नीमुळे सपात महाभारत

By admin | Updated: October 25, 2016 04:56 IST

समाजवादी पार्टीत चालू असलेल्या महाभारतामागचे कारण समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्रप्रेम होय. आपला मुलगा प्रतीक याला

- शीलेश शर्मा, नवी दिल्लीसमाजवादी पार्टीत चालू असलेल्या महाभारतामागचे कारण समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्रप्रेम होय. आपला मुलगा प्रतीक याला मुलायमसिंह यांचा उत्तराधिकारी करण्याची साधना यांची इच्छा आहे. शिवपाल यांचा अखिलेश यांना विरोध असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिवपाल आणि अखिलेश विरोधी गटाकडूनही साधना गुप्ता यांच्या इच्छेला पाठबळ मिळत आहे.मात्र, केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार (पीई-२ ए-२००७), प्रतीक हे मुुलायमसिंह यांचे चिरंजीव नाहीत. प्रतीकचे पिता चंद्रप्रकाश गुप्ता आहेत. ते साधना यांचे पती होते. १९९० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. प्रतीक हा मुलायमसिंह यांचाच पुत्र असून, त्याला अखिलेशसारखाच दर्जा मिळावा, असा दावा तेव्हापासून प्रतीक आणि साधना करीत आहेत. तथापि, अखिलेश हे वडिलांवर नाराज आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, आपल्या आईला बेदखल करून, साधना गुप्ताला मुलायमसिंह महत्त्व देत आहेत. साधनांमुळेच मुलायमसिंह हे अखिलेश यांची आई मालतीदेवी यांच्याकडे दुर्लक्ष करीत होते. २००३ मध्ये मालतीदेवी यांचे निधन झाले. त्यानंतर, साधना यांनी मुुलायमसिंह यांच्यावर वर्चस्व मिळविले. मुलायमसिंह यांचे निकटवर्तीय सांगतात की, साधनांच्या इशाऱ्यावर मुलायमसिंह वागू लागले, तसेच प्रतीकनेही निर्णयात दखल देणे सुरू केले. हे अखिलेश यांना मान्य नव्हते. असा झाला उलगडा प्रकरणाचा उलगडाअ‍ॅड. विश्वनाथ चतुर्वेदी यांच्या तक्रारीवर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, सीबीआयने मिळकतीपेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी चौकशी सुरू केली, तेव्हा या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. सर्व नोंदणीकृत दस्तावेज तपासल्यानंतर, प्रतीक याचे वडील चंद्रप्रकाश गुप्ता असल्याचे समोर आले. तथापि, प्रतीक हा मुलायमसिंह यांचाच मुलगा असल्याचे साधना गुप्ता सांगत होत्या. त्यांची नजर मुलायमसिंह यांच्या संपत्तीवर, तसेच मुलायमसिंह यांचा उत्तराधिकारी म्हणून प्रतीक याला दर्जा मिळविण्यावर होती. अखिलेश यांच्या विरुद्ध असलेल्या प्रत्येकाशी त्या संपर्क राखून डावेपच आखत होत्या.आरटीआय कार्यकर्ते विश्वनाथ चतुर्वेदी यांनी या तथ्याला दुजोरा देत सांगितले की, मिळकतीपेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी सीबीआयने केलेल्या चौकशीतून प्रतीक हा मुलायमसिंह यांचा मुलगा नाही, यासह अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.