शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशचे राज्यपाल अजून खुर्चीला चिकटून!

By admin | Updated: February 26, 2015 03:04 IST

बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळाप्रकरणी विशेष कृती दलाने (एसटीएफ) गुन्हा दाखल केल्यानंतर मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव

हरीश गुप्ता, नवी दिल्लीबहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळाप्रकरणी विशेष कृती दलाने (एसटीएफ) गुन्हा दाखल केल्यानंतर मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांची पुरती कोंडी झाली आहे़ गुन्हा दाखल झाल्यानंतरही राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर खुद्द केंद्रीय गृह मंत्रालयानेच बडगा उगारत त्यांना तत्काळ पद सोडण्याचे निर्देश दिले आहेत़मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांविरुद्ध एफआयआर दाखल होताच गृह मंत्रालयाने याप्रकरणी मध्य प्रदेश सरकार आणि राज्यपालांच्या कार्यालयाकडून अहवाल मागितला आहे़ उच्च न्यायालयाच्या निगराणीतील तपास संस्थेने घटनात्मक पदावरील व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर त्या व्यक्तीने संबंधित पदावर राहणे असमर्थनीय आहे़  राज्यपालांनी स्वत:हून निर्णय घ्यावा़ आम्ही त्यांना २४ तासांची मुदत दिली आहे़ राज्यपालांनी उद्या गुरुवारपर्यंत राजीनामा न दिल्यास त्यांना बडतर्फ केले जाईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले़अलीकडे मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप झेलणाऱ्या गुजरातच्या तत्कालीन राज्यपाल कमला बेनिवाल यांना बडतर्फ केले होते़ बेनिवाल यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता़ यानंतर मोदी सरकारने त्यांची बदली करीत नंतर त्यांची पदावरून उचलबांगडी केली होती़ वनसंरक्षक परीक्षेतील पाच उमेदवारांची व्यापमं अधिकाऱ्यांकडे शिफारस केल्याचा आरोप राज्यपालांवर ठेवण्यात आला आहे़ गत शुक्रवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अलीकडे याप्रकरणी अतिविशिष्ट(हाय डिग्निटरी)विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची परवानगी दिली होती़ यानंतर ही कारवाई करण्यात आली़राज्यपालांचे ओएसडी(आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी) धनराज यादव यांना वैद्यकीय पूर्वपरीक्षा घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यानंतर या प्रकरणात राज्यपालांचे नाव समोर आले होते़ यानंतर तपासादरम्यान राज्यपालांचे पुत्र शैलेश यादव हेही या घोटाळ्यात सामील असल्याचे उघड झाले होते़२०११ मध्ये तत्कालीन काँगे्रसप्रणीत संपुआ सरकारने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या रामनरेश यादव यांची राज्यपालपदी नियुक्ती केली होती़