शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या पदाधिकार्‍यांना धडकी ऑडिट : राज यांच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: May 12, 2014 16:47 IST

नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्‍यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडांतर येणार याची चर्चा मनसेत सुरू झाली आहे.

नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्‍यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडांतर येणार याची चर्चा मनसेत सुरू झाली आहे.राज ठाकरे यांनी नाशिकला महत्त्व दिले आणि त्यामुळेच शहरातील तीन आमदारांबरोबरच पालिकेची सत्ता मनसेला मिळाली. परंतु दोन वर्षांत अपेक्षित कामगिरी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आणि खुद्द ठाकरे यांचेही तसेच मत बनल्याने लोकसभा निवडणुकीच्या आधी नाशिकमध्ये येऊन त्यांनी झाडाझडती घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते कार्यप्रवण करण्याचा राज यांचा प्रयत्न असला, तरी लोकसभा निवडणुकीत मात्र मोठ्या प्रमाणात विसंगती आणि अनसमन्वय असल्याची मनसेतच चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीत फाटाफूट झाल्याचीदेखील चर्चा आहे. लोकसभा निवडणूक आटोपली; परंतु विधानसभेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून राज यांनी शनिवारी नगरसेवकांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांना मन मोकळे करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत काय घडले, त्याचबरोबर पदाधिकारी, आमदार, महापौर आणि पालिकेतील पदाधिकार्‍यांविषयीदेखील माहिती घेतल्याने ही खांदेपालटाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार योग्य होता; परंतु प्रचार संघटनेची योग्य यंत्रणा निवडणुकीत वापरली गेली नाही. कार्यकर्ते आणि उमेदवार यांच्यात समन्वय घालण्याची गरज असताना नेमके तेच केले गेले नाही. काहींनी तर पदाधिकार्‍यांच्या घराच्या आसपास असलेल्या मतदान केंद्रांवर पक्षाचे बूथ नव्हते, अशा थेट तक्रारी केल्या आहेत. त्यामुळेच राज आता काय निर्णय घेणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. विशेषत: राज यांच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. परंतु त्याचबरोबर विधानसभा निवडणूकही महत्त्वाची आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीचे निकाल आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून कडक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याने संघटना आणि सत्तेतील पदाधिकारी हवालदिल झाले आहेत.डॉ. पवार यांच्यावर मोठी जबाबदारीलोकसभा निवडणुकीचा आढावा घेताना बहुसंख्य नगरसेवकांनी डॉ. प्रदीप पवार यांच्याविषयी अनुकूल मत व्यक्त केल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शहराध्यक्ष समीर शेटे यांना प्रकृतीच्या कारणावरून अन्य जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.