जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत आग्वादमध्ये किसनो येऊ देणार नाही-खंवटे स्वातंत्र्य सैनिकांच्या विद्यार्थ्यांचा पर्वरीत गौरव
By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST
पर्वरी : जो तो देशापेक्षा स्वत:ची महती वाढवितो, राजकारणी इतिहास विसरले आहेत. ज्या स्वांतंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, जेथे स्वातंत्र्य सैनिकांनी आग्वाद तुरु ंगात आपले प्राण दिले त्याच तुरु ंगात आज कॅसिनो चालविण्याची भाषा सरकार करते आहे याहून दुर्दैवाची गोष्ट नाही. जोपर्यंत मी या राज्याचा आमदार आहे, तोपर्यंत कॅसिनो आग्वाद येथे येऊ देणार नाही, असे उद्गार पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आज स्वातंत्र्य सैनिकांच्या नवजीवन सोसायटीतर्फे हुशार विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्य़ात बोलताना काढले.
जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत आग्वादमध्ये किसनो येऊ देणार नाही-खंवटे स्वातंत्र्य सैनिकांच्या विद्यार्थ्यांचा पर्वरीत गौरव
पर्वरी : जो तो देशापेक्षा स्वत:ची महती वाढवितो, राजकारणी इतिहास विसरले आहेत. ज्या स्वांतंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, जेथे स्वातंत्र्य सैनिकांनी आग्वाद तुरु ंगात आपले प्राण दिले त्याच तुरु ंगात आज कॅसिनो चालविण्याची भाषा सरकार करते आहे याहून दुर्दैवाची गोष्ट नाही. जोपर्यंत मी या राज्याचा आमदार आहे, तोपर्यंत कॅसिनो आग्वाद येथे येऊ देणार नाही, असे उद्गार पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आज स्वातंत्र्य सैनिकांच्या नवजीवन सोसायटीतर्फे हुशार विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्य़ात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले, की आज सरकार प्रत्येक गोष्टीत यू टर्न घेत आहेत. निवडणुकीपूर्वी मशाली घेऊन कॅसिनोला विरोध करणारे आज त्यांना पाठिंबा देत आहेत. राज्याला खास दर्जा मिळविण्याबाबतीत सरकार अनुत्सुक आहे. विधानसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर तो दाबला जातो. आमदार विधानसभेत जनतेचे प्रश्न घेऊन जात असतात, तेथेही बोलू दिले जात नाही. आजच्या घडीला येणावळ नाहीच; परंतु ‘खानावळ’ मात्र चालू आहे. या सरकारला चांगल्या गोष्टीसाठी पाठिंबा दिला होता, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आजचा युवा वर्ग हुशार आहे म्हणूनच त्यांचा गौरव केला जातो. त्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.जि. पं. गुपेश नाईक, लॉरेन्स, प्रा. संतोष गावकर आणि श्यामसुंदर नागवेकर यांनी समयोचित भाषणे केली. आमदार खंवटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. व्यासपीठावर आमदार खंवटे, गुपेश नाईक, रोहिदास (दाद) देसाई, श्यामसुंदर नागवेकर, लॉरेन्स, प्रा. संतोष गावकर, गणेश रायकर, श्यामसुंदर कळंगुटकर उपस्थित होते.दरम्यान, स्वांतत्र्यसैनिक स्व. कांता घाटवळ यांना र्शद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)फोटो ओळी-विद्यार्थ्यांचा गौरव करताना आमदार रोहन खंवटे. सोबत इतर मान्यवर. (शेखर वायंगणकर)