शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या शहरांजवळ ‘लॉजिस्टिक हब’

By admin | Updated: March 13, 2016 04:29 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे राष्ट्रीय महामार्गांलगतच्या मोठ्या शहरांसाठी लॉजिस्टिक हब उभरण्याची योजना आखण्यात येत आहे.

प्रमोद गवळी, नवी दिल्लीकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे राष्ट्रीय महामार्गांलगतच्या मोठ्या शहरांसाठी लॉजिस्टिक हब उभरण्याची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे सामान लादणे व घेऊन जाण्यासाठी जड वाहनांना (ट्रक) शहराच्या आतून जाण्याची गरज पडणार नाही. हे हब एकप्रकारे बायपासचे काम करतील.ही योजना साकारण्याकरिता असे एक मॉडेल तयार करण्यात येत आहे ज्याअंतर्गत मंत्रालयाला जमीन खरेदीची गरज पडणार नाही. यासंदर्भात परिवहन मंत्रालयातर्फे पुढील महिन्यात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांसोबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सदर कंपन्यांकडून सूचना आणि सहकार्य मागितले जाईल. परिवहन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विविध प्रकारचे सामान वाहून नेणारे ट्रक हे मोठ्या शहरांसाठी गंभीर समस्या ठरले आहेत. हा प्रश्न लक्षात घेऊनच परिवहन मंत्रालय लॉजिस्टिक हब स्थापनेचा विचार करीत आहे. मालवाहू ट्रकमुळे निर्माण होणाऱ्या अडचणीतून याद्वारे मुक्ती मिळेल.काय आहे योजना?नियोजित योजनेंतर्गत शहराजवळ मंत्रालय ५०० ते १००० एकर जमीन अधिग्रहित करेल. पण खरेदी करणार नाही. साधारणत: ही जमीन लीजवर घेतली जाईल. ज्या शेतकऱ्यांकडून ही जमीन घेतली जाईल त्यावर त्यांचा मालकी हक्क कायम असेल. या जमिनीच्या २० टक्के भागात रस्ते, पाईप लाईन, छोट्या नाल्या, वीज खांब आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तर ४० टक्के भागात प्रत्यक्ष लॉजिस्टिक हब उभारण्यात येईल. त्यात अनेक उद्योजकांचे गोडाऊन, वितरण केंद्र आणि कार्यालये असतील. क्षेत्र आणि शहराच्या आवश्यतेनुसार हे हब रस्त्याने जोडले जातील.ट्रक दुरुस्तीसाठी सर्व्हिस स्टेशनही असेल. उर्वरित ४० टक्के विकसित जमीन संबंधित शेतकऱ्याला परत देण्यात येईल. शेतकरी त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर करु शकतील. अर्थात त्यालाही लॉजिस्टिकशी संबंधितच व्यवसाय करावा लागेल. व्यावसायिकदृष्ट्या त्याच्या जमिनीची किंमत प्रचंड वाढेल.