शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा स्थानकाजवळ लोकल गाड्यांना वेगमर्यादा

By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST

मुंब्रा स्थानकाजवळ लोकल गाड्यांना वेगमर्यादा

मुंब्रा स्थानकाजवळ लोकल गाड्यांना वेगमर्यादा
लोकलमधून पडून होणार्‍या प्रवाशांच्या मृत्यूमुळे निर्णय
मुंबई - मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील बोगद्याजवळ लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. या घटना बोगद्याजवळील एका खांबाला बॅगा अडकून तसेच खांब लागून होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत असल्याने या स्थानकादरम्यान वेगमर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंब्रा ते कळवा दरम्यान एक मोठा बोगदा असून या बोगद्याजवळ रेल्वेकडून तांत्रिक कामांसाठी नवा खांब बसवण्यात आला आहे. मात्र हा खांब रेल्वे मार्गाच्या जास्त जवळ असल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करताना लोकलच्या दरवाजाजवळ उभे असलेल्या प्रवाशांना त्याचा फटका बसतो आणि प्रवासी जखमी होतात. काही घटनांमध्ये तर या खांबाचा फटका लागून लोकलमधून पडून प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. ५ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी तीन तर ७ नोव्हेंबर रोजी दोन प्रवासी लोकलमधून पडून मृत्यू झाले आहेत. या घटनानंतर स्थानिकांकडून आंदोलनाचेही हत्यार उपसण्यात आले. होत असलेल्या घटनेची दखल घेत मध्य रेल्वेकडून तीन अधिकार्‍यांची एक समितीही नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंब्राजवळ ताशी ५0 किलोमीटर वेगाची मर्यादा घालण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे गाड्यांवर वेगमर्यादाही येणार आहे.