शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबुडव्या कंपन्यांची यादी द्या : सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: February 17, 2016 03:37 IST

बँकांच्या बुडीत कर्जांचे उत्तरोत्तर वाढत असलेले प्रमाण आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ढासळत चाललेली वित्तीय स्थिती याविषयी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर चिंता व्यक्त केली

नवी दिल्ली : बँकांच्या बुडीत कर्जांचे उत्तरोत्तर वाढत असलेले प्रमाण आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ढासळत चाललेली वित्तीय स्थिती याविषयी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर चिंता व्यक्त केली व ज्यांच्याकडे ५०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक कर्जे थकली आहेत अशा कंपन्यांची यादी रिझर्व्ह बँकेने सादर करावी, असा आदेश न्यायालयाने दिला.एवढेच नव्हे, तर ‘कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग स्कीम’नुसार ज्यांच्या कर्जांची फेररचना करण्यात आली आहे, अशा बड्या कर्जदारांचीही यादी न्यायालयाने मागितली आहे. या दोन्ही प्रकारच्या याद्या रिझर्व्ह बँकेने येत्या सहा आठवड्यांत सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करायच्या आहेत.केंद्र सरकारच्या ‘हाउसिंग अ‍ॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (हुडको) काही कंपन्यांना दिलेल्या संशयास्पद कर्जांसंबंधी ‘दि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ या स्वयंसेवी संस्थेने २००५मध्ये केलेली एक जनहित याचिका प्रलंबित आहे. सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर, न्या. उदय लळित आणि न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीस आली तेव्हा न्यायालयाने हा विषय गंभीर असल्याचे नमूद करून वरीलप्रमाणे आदेश देत प्रलंबित याचिकेत रिझर्व्ह बँकेसही प्रतिवादी केले. वर्ष २०१३ ते २०१५ या काळात २९ सरकारी बँकांनी एकूण १.१४ लाख कोटींची थकीत कर्जे त्यांच्या खातेपुस्तकांतून काढून टाकल्याची रिझर्व्ह बँकेकडूनच ‘आरटीआय’खाली मिळालेली माहिती एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकाने अलीकडेच प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने असे प्रश्न उपस्थित केले की, सरकारी बँका आणि वित्तीय संस्था सुयोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता मोठ्या रकमांची कर्जे कशी काय देतात? अशी कर्जे थकल्यावर ती वसूल करण्याची काही पुरेशी तरतूद आहे की नाही? एकट्या २०१५ या वर्षात कंपन्यांना दिलेली ४० हजार कोटी रुपयांची कर्जे वसूल होत नाहीत म्हणून बँकांनी खातेपुस्तकांतून काढून टाकली आहेत, असे याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले.मोठ्या रकमांची कर्जे वर्षानुवर्षे थकीत राहूनही ती वसूल करण्यासाठी ठोस पावले का उचलली जात नाहीत, याविषयी आश्चर्य व्यक्त करत न्यायालय असेही म्हणाले की, बड्या कर्जबुडव्यांच्या यादीवर नजर टाकली तर या मंडळींनी भली मोठी साम्राज्ये उभारली आहेत, पण तरी ते कर्जाची परतफेड करीत नाहीत, असे दिसते!