शास्त्रीय संगीतासाठी एक जीवन अपूर्णच (भाग २)
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
विदेशात आपले भारतीय संगीत लोकप्रिय होते आहे. पण यात सध्याच्या काळात थोडी संभ्रमावस्था जाणवते आहे. पूर्वी विदेशात आयोजन करणाऱ्या संस्था कमी होत्या आणि मोजके व दर्जेदार कलावंतांचेच सादरीकरण विदेशात होत असल्याने, गुणवत्तापूर्ण सादरीकरण करणारे कलावंतच विदेशात जात होते. हल्लीच्या काळात आयोजक संस्थाही वाढल्या आणि विदेशात जाणारे कलावंतही वाढले. यातल्या अनेकांचे सादरीकरण अपेक्षित दर्जाचे नसते. त्यामुळे विदेशात सादरीकरण करणारा प्रत्येक कलावंत आणि त्याची साधना महत्त्वाची असते. याचे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्हीही परिणाम आहे. आयोजक संस्था वाढल्याने आणि कलावंतही वाढल्याने अनेकांनी संधी मिळते ही चांगली बाब. पण मूळ भारतीय संगीत सादर करण्याची तयारी कलावंताची नसली तर विदेशी रसिकांना ते रुचण्याची शक्यता कमी होते. वडील प्रसिद्ध गायक असल्
शास्त्रीय संगीतासाठी एक जीवन अपूर्णच (भाग २)
विदेशात आपले भारतीय संगीत लोकप्रिय होते आहे. पण यात सध्याच्या काळात थोडी संभ्रमावस्था जाणवते आहे. पूर्वी विदेशात आयोजन करणाऱ्या संस्था कमी होत्या आणि मोजके व दर्जेदार कलावंतांचेच सादरीकरण विदेशात होत असल्याने, गुणवत्तापूर्ण सादरीकरण करणारे कलावंतच विदेशात जात होते. हल्लीच्या काळात आयोजक संस्थाही वाढल्या आणि विदेशात जाणारे कलावंतही वाढले. यातल्या अनेकांचे सादरीकरण अपेक्षित दर्जाचे नसते. त्यामुळे विदेशात सादरीकरण करणारा प्रत्येक कलावंत आणि त्याची साधना महत्त्वाची असते. याचे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्हीही परिणाम आहे. आयोजक संस्था वाढल्याने आणि कलावंतही वाढल्याने अनेकांनी संधी मिळते ही चांगली बाब. पण मूळ भारतीय संगीत सादर करण्याची तयारी कलावंताची नसली तर विदेशी रसिकांना ते रुचण्याची शक्यता कमी होते. वडील प्रसिद्ध गायक असले तरी आपण संतूरवादक झालो, कारण एकदा वडिलांसह पं. शिवकुमार शर्मा यांच्या कार्यक्रमाला गेलो आणि त्यांच्या वादनाने प्रभावित होऊन हेच वाद्य शिकायचे, हे ठरविले. संतूरवादक होण्यापूर्वी वडिलांकडून शास्त्रीय गायनाची तालीम घेतली होती. यासोबतच शिक्षणही सुरू होते. एमएस्सी आणि एमबीए केले. सध्या अनेक संगीत महोत्सवात सादरीकरणासह अमेरिकी संगीतकारांसह विदेशात फ्युजनचे कार्यक्रमही होत आहेत. त्यांच्या वादनाच्या अनेक ध्वनिफिती, सीडी रसिकांसाठी उपलब्ध आहे.