अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील गुन्ह्यात ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आल्याने जमा झालेल्या पैशांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्व बँकांना तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी पत्र देऊन जाधव कुटुंबीयांच्या खात्यावरील जमा रकमेचा तपशील मागितला आहे. राज्य शासनासह विविध संघटना, व्यक्तींनी मयतांच्या नातेवाईकांना मदत दिली होती. फिर्यादीच आरोपी निघाल्याने ॲट्रॉसिटीचे कलम वगळण्याबाबत पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज केलेला आहे. सोमवारी न्यायालयाने तपासाबाबत फटकारल्यानंतर पोलिसांनी रकमेचा तपशील संकलित करण्याची कारवाई सुरू केली आहे.
जवखेडे प्रकरणी बँकांना पत्र
By admin | Updated: December 31, 2014 18:59 IST