शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

Arun Jaitley: चला कल्याणकारी राष्ट्र घडवू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 05:48 IST

भारतीय असल्याचा मलाही तुमच्यासारख्याच अभिमान आहे. आमच्यासमोर अनेक कठीण आव्हाने आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांत अरुण जेटली यांचा सक्रिय सहभाग होता. वित्तमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात नोटाबंदी, जीएसटी, जनधन यासारखे अनेक ऐतिहासिक निर्णय यशस्वीपणे अंमलात आणले गेले. राष्ट्रउभारणीच्या संदर्भात त्यांचे हे विचार.

भारतीय असल्याचा मलाही तुमच्यासारख्याच अभिमान आहे. आमच्यासमोर अनेक कठीण आव्हाने आहेत. लोकशाहीने नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली. सद्य:स्थिती झपाट्याने बदलली पाहिजे, अशी लोकांची इच्छा आहे. प्रदान करण्यात आलेली घटनात्मक हमी प्रत्यक्ष जीवनात लाभावी, असे लोकांना वाटते. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने अर्थव्यवस्था विकासाच्या वाटेवर अग्रेसर असावी. राजकारण्यांनी अभिनिवेश आणि दांभिकपणाला तिलांजली देत, सचोटीने, प्रामाणिकपणे लोकांच्या उन्नतीसाठी काम करावे. सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, असे जनतेला वाटते. माझ्या दृष्टिकोनातून भारत निश्चितच गरिबांहून गरीब, दुर्बल, उपेक्षितांसाठी भेदभावरहित काम करणारे कल्याणकारी राष्टÑ होऊ शकते. अशा कल्याणकारी राष्ट्रासाठी मोठ्या संसाधनाची गरज असते. त्यासाठी भक्कम महसूल उभारावा लागतो. महसूल वाढविण्यासाठी दीर्घावधीसाठी आर्थिक विकास आवश्यक आहे. भारताकडे समृद्धशाली संसाधने आहेत. वैश्विकरणाच्या दिशेने अग्रेसर होत असलेल्या जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारताने सज्ज झाले पाहिजे. व्यापक विचार, दृष्टिकोन बाळगावा. हा विचार कृतीत उतरविण्यासाठी आवश्यकता आहे, एक दिलाने, सहकार्याने, निर्धारपूर्वक काम करण्याची.(राष्ट्र उभारणीसाठी अरुण जेटली यांनी मांडलेले विचार.)

सैन्य दले दुबळी नाहीतआमची सैन्य दले दुबळी नाहीत. भारत पूर्णपणे संरक्षणसिद्ध आहे. २०१३ सारखी परिस्थिती आता राहिलेली नाही, असे जेटली यांनी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी पार पाडताना जुलै, २०१७ मध्ये म्हटले होते.वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाआॅक्टोबर, २०१७ मध्ये जेटली यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात अमेरिकन गुंतवणूकदारांना म्हटले होते की, उभय देशांतील संबंध परिपक्व आहेत. अगदी वेळेवर संरचनात्मक सुधारणा भारताने केल्या आहेत. त्यांचा भविष्यात फायदा होणार आहे. जगाचा विकास दर २.५ टक्के आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वेगाने वाढणारी आहे. सुधारणांसाठी ही योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले होते.निवृत्तीनंतरही सक्रियता२०१९च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार आधीपेक्षा जास्त बहुमताने निवडून आले. तथापि, जेटली यांनी प्रकृतीच्या कारणामुळे या सरकारमध्ये सहभागी होण्याचे नाकारले. २९ मे, २०१९ रोजी त्यांनी एक पत्रच त्यासाठी मोदी यांना लिहिले. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले असले, तरी समाजमाध्यमांवर ते सक्रिय होते. समाजमाध्यमांतून ते मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करीतच राहिले. घटनेतील ३७० व ३५अ कलम हटविण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी पोस्ट त्यांनी नुकतीच टाकली होती.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली