शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

...तुमचाही कलबुर्गी करु - गिरीश कर्नाड यांना धमकी

By admin | Updated: November 12, 2015 12:39 IST

बेंगळुरु विमानतळाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी करणारे नाटककार व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

बेंगळुरु, दि. १२ - टिपू सुलतान हिंदू असते तर त्यांना शिवाजी महाराजांप्रमाणे सन्मान मिळाल असता असे सांगत बेंगळुरु विमानतळाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी करणारे नाटककार व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आले आहे.

कर्नाटकमध्ये सध्या टिपू सुलतान जयंतीचा वाद चांगलाच चिघळला आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी जयंती साजरी करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. कर्नाटक सरकारच्या एका कार्यक्रमात गिरीश कर्नाड यांनी बेंगळुरु विमानतळला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी केली होती. या विधानानंतर गिरीश कर्नाड यांच्यावर भाजपासह अन्य हिंदूत्ववादी संघटनांनी टीकेची झोड उठवली आहे.

ट्विटरवर इनटॉलरंट चंद्र नामक युजरने गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी दिली. 'जर बेंगळुरु विमानतळाला केंपेगौडाऐवजी टिपू सुलतान यांचे नाव देऊन कन्नड जनतेच्या भावना दुखावल्या तर तुमचाही कलबुर्गींप्रमाणेच अंत होईल' असे या ट्विटमध्ये म्हटले होते. पोलिसांनी या ट्विटची दखल घेतली असून सध्या हे ट्विट डिलीटही करण्यात आले आहे. दरम्यान, या विधानावर वाद सुरु होताच कर्नाड यांनी माफी मागितली आहे.