शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

सोनियांच्या नेतृत्वात धरणे

By admin | Updated: August 4, 2015 23:52 IST

लोकसभेत आपल्या २५ सदस्यांच्या निलंबनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस खासदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात

नवी दिल्ली : लोकसभेत आपल्या २५ सदस्यांच्या निलंबनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस खासदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मंगळवारी संसद भवन परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून धरणे दिली. आमच्या सर्व खासदारांना संसदेतून बाहेर फेकले तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निलंबनाची कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला, तर मुख्य विरोधी पक्ष परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्रिद्वय वसुंधरा राजे आणि शिवराजसिंह चौहान य् ाांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहील, असे राहुल यांनी ठासून सांगितले. काँग्रेस अध्यक्षा पक्षाच्या धरणे आंदोलनात सहभागीच झाल्या नाही, तर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, ए. के. अँटोनी आणि आनंद शर्मा यांच्यासोबत त्यांनी लोकसभा अध्यक्षांविरुद्ध जोरदार घोषणाही दिल्या. माजी पंतप्रधान मनमोहनसिंगही यावेळी उपस्थित होते. समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलाचे सदस्यही काँग्रेस खासदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप सपा अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी केला.उत्तर प्रदेशात लखनौ आणि जम्मूत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष खासदारांच्या निलंबनाविरुद्ध निदर्शने केली. नवी दिल्ली : संसद परिसरात सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडण्यात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मंगळवारी सक्रिय भूमिका बजावली. स्वत: आक्रमक होताना राहुल, सोनिया गांधी यांनी आपल्या खासदारांवरही बारीक नजर ठेवली. ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, गौरव गोगोई, राजीव सातव, रजनी पाटील हे घोेषणाबाजी करण्यात अग्रेसर होते. धरणे दिले जात असताना अचानक राजीव सातव यांचा शोध सुरू झाला. कारण काळे झेंडे, काळे कपडे त्यांच्याकडे होते. त्यांच्या नावाचा पुकारा होताच ते धावत आले आणि त्यांनी सर्व सामग्री सोपविली. दुसरीकडे अंबिका सोनी आणि अशोक चव्हाण टीव्हीवर बाईट देण्यात व्यग्र होते. सोनिया गांधी यांची नजर त्यांच्यावर पडताच त्यांनी या दोघांना धरणे देण्यासाठी बोलावण्याचा आदेश दिला. सुब्बीरामी रेड्डी यांच्याकडेही सोनिया गांधी यांचे लक्ष गेले. त्यांनी काळे कपडे परिधान केले नव्हते. सोनियांनी त्याबद्दल विचारताच त्यांनी घाईघाईत कपडे चढविले. सोनिया, राहुल यांनी घोषणा देत आवाज बुलंद केला, मात्र गुलाम नबी आझाद यांचा स्वर ऐकू येत नव्हता. सोनियांनी त्यांना नम्रपणे विचारले की, तुम्ही घोषणा देत नाहीत काय? मग काय गुलाम नबींनीही आवाज वाढविला. नबींकडेच धरणेस्थळावरील संपूर्ण व्यवस्था सोपविण्यात आली होती. खा. विजय दर्डा, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल यांच्यासह सर्व खासदार उपस्थित होते. बुधवारीही धरणे आंदोलन सुरूच राहील.(लोकमत न्यूज नेटवर्क)