शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन जोडणीच्या कामाचा शुभारंभ

By admin | Updated: April 18, 2016 00:54 IST

लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़

लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़ ५० वॅगन एका खेपेत आणण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे आहे़ मात्र पाणी उतरवून घेण्याची क्षमता नसल्याने सद्य स्थितीत १० वॅगन एका खेपेत आणल्या जात आहेत़ ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यासाठी पाईपलाईन व पंप बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे़ रेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीपासून आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन करण्यात येत असून, रविवारी या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले़ २ किमी अंतरापर्यंतचे खोदकाम पुर्ण झाले असून, प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईप बुजविण्यात आले आहेत़ शिवाय, विहिरीवर विद्युतपंप बसविण्याचे कामही सुरु झाले आहे़ सोमवारपर्यंत १२ पंप विहिरीवर बसविले जाणार आहेत़प्रगती कन्सट्रक्शन मार्फत पाईपलाईनचे काम करण्यात येत असून, शासनाकडून पाईपचा पुरवठा झाला नव्हता़ त्यामुळे केवळ खोदकाम सुरु होते़ शनिवारी रात्री पाईपचा पुरवठा झाला आहे़ गुजरात राज्यातून पाईप आले आहेत़ प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईपचा पुरवठा झाला असून, ते बसविण्यातही आले आहेत़ अन्य पाईप रविवारी रात्रीपर्यंत प्राप्त होणार आहेत़ त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत पाईपलाईनचे काम पुर्ण होईल असे प्रगती कन्सट्रक्शनचे संचालक गोविंदराव माकणे यांनी सांगितले़ रविवारी सकाळी ९ वाजता मिरजेहून जलपरीची सहावी खेप झाली़ १० वॅगनमधील ५ लाख लिटर पाणी ४४ मिनीटांत उतरवून घेण्यात आले़ त्यानंतर विहिरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात टाकण्यात आले़ पाईपलाईन पुर्ण झाल्यानंतर ५० वॅगनची जलपरी येणार आहे़ हे पाणी उतरवून घेण्यासाठी विहिरीवर १२ पंप बसवून या पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाणार आहे़ त्यासाठी ही पाईपलाईन करण्यात येत आहे़ २ किलोमीटर अंतराचे खोदकाम पुर्ण झाले असून, रविवारी आलेले ३४ पाईपही बुजविण्यात आले आहेत़ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेतील पाणी उतरविणे, साठविणे आणि टँकरद्वारे त्याची वाहतूक करण्याच्या कामाची पाहणी केली़