शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमध्ये स्मारकाचे लोकार्पण

By admin | Updated: November 15, 2015 03:06 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवासस्थानाच्या माध्यमातून समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश जगाला कायम प्रेरणा देत राहील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

लंडन : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवासस्थानाच्या माध्यमातून समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश जगाला कायम प्रेरणा देत राहील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. डॉ. आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनमधील किंग हेन्री मार्गावरील निवासस्थान शनिवारी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.या छोटेखानी कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी या निवासस्थानाला भेट दिली आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली दुर्मीळ छायाचित्रे आणि अन्य संस्मरणीय वस्तूंची माहिती घेतली. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भावपूर्ण अभिवादन केले. पंतप्रधान मुंबईत इंदू मिल स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना या निवासस्थानाला भेट देण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारत आपल्या लंडनच्या दौऱ्यादरम्यान या कार्यक्रमाचा समावेश केला. (वृत्तसंस्था)‘जय भीम’चा जयघोष या ऐतिहासिक वास्तूतील दुर्मीळ छायचित्रे आणि संस्मरणीय वस्तूंची पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर बाहेर हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांनी जय भीम आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराचा जयघोष करून परिसर दणाणून टाकला. हा ऐतिहासिक दिवस - देवेंद्र फडणवीस हा एक ऐतिहासिक दिवस! भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले घर, जेथे राहून त्यांनी लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले, ते घर आज पंतप्रधानांच्या हस्ते स्मारक रूपाने जनतेकरिता खुले झाले आहे. समता आणि बंधुता या आधारावर समाज आणि देश प्रगती करू शकतो, हे आपल्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी अधोरेखित केले आहे. भारतमातेच्या या सुपुत्राला माझी वंदना. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र!