शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पाक सीमेवर लेझर भिंती!

By admin | Updated: January 18, 2016 03:57 IST

पंजाबमधील भारत-पाक सीमेवरील नदीभागात ४० पट्ट्यांमध्ये कुंपण नसल्यामुळे अतिरेक्यांना घुसखोरी करणे शक्य होत असल्याचे पाहता गृह मंत्रालयाने लवकरच तेथे लेझर भिंती उभारण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे

नवी दिल्ली : पंजाबमधील भारत-पाक सीमेवरील नदीभागात ४० पट्ट्यांमध्ये कुंपण नसल्यामुळे अतिरेक्यांना घुसखोरी करणे शक्य होत असल्याचे पाहता गृह मंत्रालयाने लवकरच तेथे लेझर भिंती उभारण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पठाणकोट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांना अटकाव घालण्याचा त्यामागे उद्देश असेल.नदीपात्राला लागून असलेला कुंपण नसलेला भाग पंजाबात असून, सीमा सुरक्षा दलाने विकसित केलेल्या ‘लेझर वॉल’ तंत्रज्ञानाद्वारे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असे गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. लेझरचा स्रोत आणि डिटेक्टर यांच्यामध्ये असलेल्या रेषेतून एखादी वस्तू जात असल्यास ती हुडकून काढणारी ही यंत्रणा प्रभावी ठरू शकते. घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचे आढळून येताच नदीवर लेझर किरण सोडला जात असतानाच मोठा आवाज होऊन सतर्कतेचा इशारा दिला जाईल.हल्ल्यानंतर शहाणपण... : जैश-ए-मोहम्मदच्या सहा अतिरेक्यांनी पठाणकोट हवाईतळावर प्रवेशासाठी बामीयाल भागातील ऊजी नदीतून घुसखोरी केली होती. १३० मीटर रुंद या नदीच्या पात्रात कॅमेरा लावण्यात आला असला तरी त्यात फूटेज रेकॉर्ड होत नसल्याचे आढळून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी रोजी पठाणकोट हवाईतळाला भेट दिली त्या वेळी लेझर भिंतींनी हा भाग बुजवून टाकण्यात आला होता.