शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
2
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
3
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
4
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
5
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
6
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
7
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
8
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
9
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
10
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
11
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
12
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
13
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
14
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
15
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
16
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
17
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
18
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
19
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  

‘रोकड’ने न्याय व्यवस्थेत प्रचंड खळबळ; बदली नको, थेट राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:12 IST

सिंग म्हणाले, “मला वाटते की अशा परिस्थितीत बदली हा उपाय नाही, त्यांना राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे. वरिष्ठ वकील राकेश द्विवेदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशी करून न्यायाधीशांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन सर्व तथ्य शोधून काढावे. न्यायाधीशांची प्रतिष्ठा आहे, ही बाब दाबून ठेवता येणार नाही.

नवी दिल्ली :  दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्यानंतर, कायदेतज्ज्ञांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बदली करण्याच्या कॉलेजियमच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी हे प्रकरण ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे सांगितले आणि न्यायाधीशांना राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे. ते म्हणाले की न्यायाधीशाने ‘पूर्णपणे प्रामाणिक’ असणे अपेक्षित आहे आणि हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तो (भ्रष्टाचार) अजिबात खपवून घेतला जाऊ नये.

सिंग म्हणाले, “मला वाटते की अशा परिस्थितीत बदली हा उपाय नाही, त्यांना राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे. वरिष्ठ वकील राकेश द्विवेदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशी करून न्यायाधीशांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन सर्व तथ्य शोधून काढावे. न्यायाधीशांची प्रतिष्ठा आहे, ही बाब दाबून ठेवता येणार नाही.

नेता असता तर लगेच कारवाई  झाली असती न्या. वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याचे प्रकरण शुक्रवारी संसदेत गाजले. 

काँग्रेसचे जयराम रमेश यांनी सकाळच्या सत्रात हा मुद्दा उपस्थित करून अलाहाबाद उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग चालवण्यासंबंधीच्या प्रलंबित नोटिसीचाही उल्लेख केला.

हेच प्रकरण एखादा राजकीय नेता, नोकरशहा किंवा उद्योगपतीशी संबंधित असते तर त्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई झाली असती, असेही रमेश यांनी नमूद केले.

न्यायपालिकेतील भ्रष्टाचार ही गंभीर समस्या : सिब्बल न्यायपालिकेतील भ्रष्टाचार ही गंभीर समस्या असून, न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची गरज असल्याचे राज्यसभेचे खासदार व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. 

२०२१ मध्ये नेमणूकन्या. यशवंत शर्मा यांची २०२१ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. 

‘आम्ही’ काही कचराकुंडी नाही...घरात प्रचंड रोख रक्कम सापडल्याने वादग्रस्त ठरलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. वर्मा यांची कॉलेजियमने अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली आहे. यावर बार असोसिएशनने प्रचंड नाराजी व्यक्त केली.

शुक्रवारी सुनावणी टाळली दिल्ली उच्च न्यायालयात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश असलेले वर्मा यांनी आपल्या घरी प्रचंड स्वरूपात रोख रक्कम सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी कोणत्याही प्रकरणावर सुनावणी केली नाही. 

या प्रकरणावर टिप्पणी नको : भाजपन्या. वर्मा प्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सावध भूमिका घेत न्यायालयांच्या अशा प्रकरणांत पक्षाने टिप्पणी करू नये, असे मत मांडले. सरन्यायाधीशांनी याची दखल घेतली असल्याने यावर मत मांडणे चुकीचे असल्याचे पात्रा म्हणाले. 

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार