शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनावरून पेच!

By admin | Updated: February 26, 2015 03:11 IST

भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने मोदी सरकारवरील दबाव कमालीचा वाढला आहे. काँग्रेसने बुधवारी जंतरमंतरवर

नवी दिल्ली/मुंबई : भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने मोदी सरकारवरील दबाव कमालीचा वाढला आहे. काँग्रेसने बुधवारी जंतरमंतरवर आंदोलन करताना या शेतकरीविरोधी विधेयकाला सर्वशक्तिनिशी विरोध करण्याचे ऐलान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे आपले आक्षेप नोंदविले; तर केंद्रात व राज्यातही सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने विधेयकाचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवा, असा स्पष्ट आदेशच जिल्हाप्रमुखांना दिला आहे. विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने ‘जमीन वापसी’ रॅलीचे आयोजन करताना अण्णा हजारे यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाची याद जागवली. अण्णांनी दिल्लीतील जंतरमंतरवर भूसंपादन विधेयकाविरुद्ध दोन दिवस आंदोलन केले होते. काँग्रेसनेही जंतरमंतरवरच आंदोलन केले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीविना झालेल्या बुधवारच्या आंदोलनात दिग्विजयसिंग, राज बब्बर, जयराम रमेश आणि सुबोधकांत सहाय यांच्यासह अंदाजे दोन हजार कार्यकर्ते सामील झाले होते.> उद्धव म्हणतात, रान उठवाजमीन संपादन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, ही बाब गावागावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या संपर्कप्रमुखांना दिला. नव्याने नेमलेल्या संपर्कप्रमुखांची ठाकरे यांनी बैठक घेतली. सध्या केंद्रात व राज्यात काय सुरू आहे ते वेगळे सांगायची गरज नाही, असे नमूद करून ठाकरे यांनी जमीन संपादन कायद्यातील काही बदलांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहिली असून, यापुढेही राहणार असे त्यांनी बजावले.> मोदी सरकारने जे भूमी अधिग्रहण विधेयक मांडले आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला या तीन मुद्यांवर आक्षेप आहे. सरकारसोबत जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा बदल आम्हाला अजिबात मान्य नाही, असे आम्ही सांगू. या बदलाला आमचा विरोध असल्याने विधेयकालाही आम्ही विरोध करू. - शरद पवार