शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लख्वीला पुन्हा जामीन; सुटका मात्र अशक्य

By admin | Updated: January 10, 2015 00:21 IST

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वीला पाकिस्तानातील एका न्यायालयाने अफगाण नागरिकाच्या अपहरण प्रकरणात जामीन दिला आहे.

इस्लामाबाद : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वीला पाकिस्तानातील एका न्यायालयाने अफगाण नागरिकाच्या अपहरण प्रकरणात जामीन दिला आहे. मात्र, सार्वजनिक सुव्यवस्था कायद्याखालील त्याच्या स्थानबद्धतेबाबत दुसरे न्यायालय निकाल देईपर्यंत त्याची कारागृहातून सुटका होऊ शकणार नाही. अफगाण नागरिक अन्वर खान याच्या अपहरण प्रकरणात जामिनासाठी लख्वीने अर्ज दाखल केला होता. तो मंजूर करण्यात आला. (वृत्तसंस्था) इस्लामाबादेतील कनिष्ठ न्यायालयाने काल दाखल करून घेतला. .प्राथमिक माहिती अहवालात नमूद अन्वर खान नामक व्यक्ती कपोलकल्पित आहे, असेही आपण न्यायालयास सांगितल्याचे अब्बासी म्हणाले. सरकारने भारताच्या दबावामुळे लख्वीविरुद्ध खटला दाखल करण्याची घाई केली. भारत मुंबई हल्ला प्रकरणाच्या खटल्यात आपल्या अशिलाला जामीन मिळाल्यावरून नाराज होता. त्यामुळे काहीही करून लख्वीला तुरुंगात ठेवावे यासाठी अपहरणाची ही कथा रचण्यात आली, असा दावा अब्बासींनी केला. दुसरीकडे सरकारी वकिलांनी लख्वीच्या अटकेचे समर्थन केले. इस्लामाबाद पोलीस खान अपहरण प्रकरणाचा तपास करत होते. ही व्यक्ती सहा वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी आरोपीची कोठडी मिळवणे आवश्यक आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. लख्वीला १५ जानेवारी रोजी न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार असून तेव्हा पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करतील, असेही सरकार पक्षाने स्पष्ट केले. मात्र, न्यायाधीशांनी लख्वीला जामीन दिला. न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर लख्वीला जामीन दिला, असे त्याचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले. आपल्या अशिलाला खोट्या व बनावट प्रकरणामध्ये गोवण्यात आले असल्याचे आपण न्यायाधीशांना सांगितले. आपल्या अशिलाला स्थानबद्ध ठेवण्याचे सरकारचे आदेश न्यायालयाने निलंबित केल्यानंतर पोलिसांनी त्याला कारागृहात ठेवण्यासाठी ही खोटी कथा रचली आहे, असे अब्बासी म्हणाले.