शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कुतुबमीनार कलतोय...

By admin | Updated: March 3, 2016 04:25 IST

कुतुबमीनार हळूहळू आपल्या पायापासून कलतो आहे. परंतु हे कलणे किरकोळ आहे, असे सरकारला वाटते. मात्र तो कलू नये, यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कुतुबमीनार हळूहळू आपल्या पायापासून कलतो आहे. परंतु हे कलणे किरकोळ आहे, असे सरकारला वाटते. मात्र तो कलू नये, यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी बुधवारी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. डेहराडून येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, कुतुबमीनार आपल्या पायाच्या तुलनेत दरवर्षी सरासरी ३.५ सेकंद दराने कलतो आहे, जे नगण्य आहे. हा पाया मजबूत राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, असेते म्हणाले.हिंदू-जैन प्रतिमा सापडल्याकुतुबमीनार शेजारी संरक्षण आणि वैज्ञानिक साफसफाई दरम्यान हिंदू आणि जैन मंदिरांचे काही वास्तुशिल्पीय अवशेष सापडले होते. त्यातील काही अवशेष कुतुब परिसरात प्रदर्शित केले आहेत, तर उर्वरित प्रतिमांना त्याच परिसरात संरक्षित करण्यात आले आहे, असे शर्मा यांनी सांगितले. कुतूबमीनार परिसरात कोणतेही उत्खनन करण्यात आलेले नाही, केवळ वैज्ञानिक साफसफाई तेवढी करण्यात आली, असा दावाही शर्मा यांनी यावेळी केला.समीक्षा समिती नाहीसरकारने मुलकी-लष्करी संबंधांची समीक्षा करण्यासाठी कोणतीही विशेषज्ज्ञ समिती गठित केलेली नाही, अशी माहिती खा. दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)