शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालकावर कुर्‍हाडीने वार

By admin | Updated: March 15, 2017 22:29 IST

नाशिक : रस्ता ओलांडणार्‍या मुलाला ट्रकचा धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालकास जबर मारहाण करून कुर्‍हाडीने वार केल्याची घटना मंगळवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास गिरणारे परिसरात घडली़ यामध्ये ट्रकचालक सुनील काळू मोरे (३१, रा. बजरंगवाडी, ता. विल्होळी) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

नाशिक : रस्ता ओलांडणार्‍या मुलाला ट्रकचा धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालकास जबर मारहाण करून कुर्‍हाडीने वार केल्याची घटना मंगळवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास गिरणारे परिसरात घडली़ यामध्ये ट्रकचालक सुनील काळू मोरे (३१, रा. बजरंगवाडी, ता. विल्होळी) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजेच्या सुमारास सुनील मोरे हे ट्रक (एमएच १५, बीजे ३१६३) घेऊन हरसूलकडे जात होते़ गिरणारे परिसरातून जात असताना रस्ता ओलांडत असलेल्या एका मुलास ट्रकचा धक्का लागला़ यामुळे तेथे उपस्थित असलेल्या अज्ञात इसमांनी मोरे यांच्याशी हुज्जत घालत मारहाण केली़ तर, यातील एकाने काही समजण्याच्या आत डोक्यात कुर्‍हाड मारली़यामध्ये ट्रकचालक मोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी उपचारासाठी प्रथम गिरणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ दरम्यान, प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी गिरणारे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)