हत्तीच्या हल्ल्यातील मृताच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत वनखात्याची मान्यता मिळाल्याची कुपेकरांची माहिती
By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST
नेसरी : आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांत हत्ती व गव्यांपासून होणार्या नुकसानीबाबत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडून चर्चा घडवली, तसेच हत्तींच्या हल्ल्यातील मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना दिली जाणारी मदत कमी असून, ती पाच लाख रुपये मिळावी, अशी मागणी केली. त्याला वनखात्याने मान्यता दिली असून, पुरवणी यादीत या मदतीचा समावेश केल्याचे कुपेकर यांनी सांगितले.
हत्तीच्या हल्ल्यातील मृताच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत वनखात्याची मान्यता मिळाल्याची कुपेकरांची माहिती
नेसरी : आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांत हत्ती व गव्यांपासून होणार्या नुकसानीबाबत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडून चर्चा घडवली, तसेच हत्तींच्या हल्ल्यातील मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना दिली जाणारी मदत कमी असून, ती पाच लाख रुपये मिळावी, अशी मागणी केली. त्याला वनखात्याने मान्यता दिली असून, पुरवणी यादीत या मदतीचा समावेश केल्याचे कुपेकर यांनी सांगितले.तसेच पिकांच्या नुकसानीबाबत सर्वेक्षण होऊन तत्काळ पैसे शेतकर्यांना देण्याचे आश्वासन वनमंत्र्यांनी दिले आहे. तारेवाडी-हडलगे पुलाला नाबार्डची मान्यता मिळाली आहे. एकूण तीन कोटी ७७ लाखांची मान्यता मिळाली असून, आपली या पुलाची उंची वाढविण्याची मागणी असल्याचे सांगून येत्या मार्च २०१५ मध्ये बजेटला मान्यता मिळणार असल्याचे खात्रीने सांगितले. तसेच वनखात्याला योग्य ती वाहने पुरवावी, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे कुपेकरांनी दूरध्वनीवरून सांगितले. (वार्ताहर)