कोपरगावच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार स्नेहलता कोल्हे: शंभर कोटीचा निधी मंजूर
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी शंभर दिवसात शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे रस्त्यांचे भाग्य उजाळणार असल्याचे आ़ स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले़
कोपरगावच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार स्नेहलता कोल्हे: शंभर कोटीचा निधी मंजूर
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी शंभर दिवसात शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे रस्त्यांचे भाग्य उजाळणार असल्याचे आ़ स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले़आ़ स्नेहलता कोल्हे यांनी शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शंभर दिवसात जीवाचे रान करून तालुक्यातील विविध विकास कामांसाठी शंभर कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंंधीत मंत्र्यांकडून मंजूर करून आणता आला़ यात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे योगदान आहे़ टाकळी, टाकळी फाटा, कोपरगाव रेल्वे स्टेशन ते संवत्सर नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, साईबाबा कॉर्नर ते कोपरगाव रेल्वे स्टेशन ते उक्कडगाव या रस्ता चौपदीकरणासाठी ७० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ ही कामे लवकरच सुरू होतील़ या शिवाय तालुक्यासाठी नव्याने १८५ वीज रोहित्र, सोळा बंधार्यांची कामे मंजूर झाली आहेत़ या तालुक्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्याचा विडा मी उचलला आहे़ शंभर दिवसांत शंभर कोटींचा निधी आपल्याला मिळविता आला़ तालुक्याच्या हक्काच्या पाटपाण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपोषण केले, जिरायती भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे धरणाचे कालवे कामांसाठी एआयबीपी योजनेत या प्रस्तावाचा समावेश केला़ येथील रस्त्यांची समस्या सर्वात मोठी आहे़ ती मार्गी लावण्यासाठी जीवाचे रान करू. महिला बचतगटाने जी मोलाची साथ दिली, त्यांच्या विश्वासाला तडा जावू दिला जाणार नाही, त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी प्राधान्याने काम करू, बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कृतीवर भर देत आहोत़ सर्वांच्या सहकार्याने शंभर कोटीचा निधी मिळविता आला, याचेच मला समाधान असल्याचे कोल्हे शेवटी म्हणाल्या़ (प्रतिनिधी)