शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून सेंट्रिंग कामगाराचा भोसकून खून

By admin | Updated: June 10, 2014 00:55 IST

मुख्य आरोपीस अटक; अन्य तिघे फरार

मुख्य आरोपीस अटक; अन्य तिघे फरार

कोल्हापूर : भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या सेंट्रिंग कामगारास आज, सोमवार रात्री नऊच्या सुमारास चौघा तरुणांनी सत्तूरने भोसकले. गंभीर जखमी अवस्थेत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. नीलेश दशरथ कांबळे (वय २६, रा. सुधाकर जोशीनगर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ दीपक याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी रात्री उशिरा मुख्य संशयित आरोपी सचिन बबरू गायकवाड (वय २९, रा. कळंबा, ता. करवीर) याला अटक केली. तर त्याचे साथीदार संशयित प्रभू गायकवाड, अर्जुन दबडे, सहदेव कांबळे हे तिघे पसार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
नीलेश कांबळे हा सेंट्रिंगचा व्यवसाय करीत होता. तो खडी-वाळू मिक्स करणारे मिक्सर मशीन भाड्याने देत असे. त्याच्या स्वत:च्या घराचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यासाठी त्याने खडी-वाळू आणून ती रस्त्याच्या कडेला ओतली होती. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास त्याचा लहान भाऊ दीपक हा आपल्या घरी खडी भरून नेत होता. यावेळी या ठिकाणी संशयित आरोपी सचिन गायकवाड, प्रभू गायकवाड, अर्जुन दबडे, सहदेव कांबळे हे चौघेजण आले. यावेळी त्यांनी दीपकला मारहाण करीत मी जोपर्यंत या ठिकाणी आहे, तोपर्यंत खडी न्यायची नाही, अशी दमदाटी केली. त्यानंतर दीपकने घरी जाऊन हा प्रकार भाऊ नीलेश याला सांगितला. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी तो बाहेर गल्लीत उभ्या असलेल्या चौघांसमोर आला. तू माझ्या भावाला का मारलास, असे त्याने विचारणा करताच सचिन गायकवाड याने जवळ असलेल्या सत्तूरने त्याच्या पोटात सपासप वार केले. यावेळी वार चुकविताना त्याच्या उजव्या हातावरही वार लागला. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. त्यानंतर सर्वजण पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या नीलेशला दीपकने रिक्षातून सीपीआरमध्ये आणले. याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
चौकट............
दीड वर्षापूर्वी हल्ला
संशयित आरोपी सचिन गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. तो सुधाकर जोशीनगरात यापूर्वी राहण्यास होता. सध्या तो कळंबा येथे राहण्यास आहे. परंतु त्याची ऊठबस सुधाकरनगरमध्ये नेहमी असते. कामधंदा न करता परिसरात दहशत माजवित वर्चस्व निर्माण करण्याचा तो नेहमी प्रयत्न करीत असे. दीड वर्षापूर्वी त्याने व त्याच्या भावांनी दीपक कांबळे याच्यावर तलवार हल्ला केला होता. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी त्याची व नीलेशची वादावादी झाली होती. हा वाद दोन-तीन वेळा मिटविण्यात आला होता. नीलेशही बिल्डर असल्याने त्याचेही भागात बर्‍यापैकी वर्चस्व होते, हे सचिनला खटकत होते. त्यातून आज खडी उचलण्याच्या वादाचे निमित्त करून नीलेशचा त्यांनी काटा काढल्याची चर्चा घटनास्थळी होती.

..............................................................
फोटो : 09 कोल-नीलेश कांबळे