रेल्वे गाड्यांमध्ये कोकम सरबत
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
रेल्वे गाड्यांमध्ये
रेल्वे गाड्यांमध्ये कोकम सरबत
रेल्वे गाड्यांमध्येदेणार कोकम सरबतपणजी : कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये प्रवासी वर्गाला गोव्याचे कोकम सरबत पुरविण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जावी ही गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना केलेली विनंती मान्य झाली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई ते गोवा या विशेष पर्यटन रेल्वेत पर्यटकांना कोकम सरबत पुरविले जाईल, असे परुळेकर यांनी सांगितले. थिवी ते करमळीपर्यंतच्या प्रवासावेळी आपल्याला प्रभू यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये कोकम सरबत पुरविण्यासाठी आपण मान्यता देऊ, असे प्रभू यांनी सांगितल्याचे परुळेकर म्हणाले. अनेक पर्यटक असे असतात ते विमानाने गोव्यात येऊ शकत नाही.त्यांच्यासाठी मुंबई- गोवा ही पर्यटक रेल्वे वरदान ठरेल. गोव्यातील हस्तकारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंची रेल्वे स्थानकांवर विक्री करता यावी म्हणून स्थानकांवर जागा उपलब्ध करावी, अशीही मागणी आपण केली. प्रभू यांनी तिही मान्य केली आहे. महिलांच्या स्वयंसहाय्य गटांकडून ही विक्री केली जाईल. गोव्याच्या हस्तकला त्यामुळे सर्वत्र पोहचतील, असे ते म्हणाले.(खास प्रतिनिधी)