शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतनिधीतून कोहलीला रक्कम?

By admin | Updated: February 25, 2017 23:30 IST

उत्तराखंडमध्ये सरकारने जाहिरातीसाठी क्रिकेटपटू विराट कोहलीला केदारनाथ पूरग्रस्तांच्या मदतनिधीतून ४७ लाख १९ हजार रुपये दिले होते का? हे खरे की खोटे हे स्पष्ट व्हायचे आहे.

देहरादून : उत्तराखंडमध्ये सरकारने जाहिरातीसाठी क्रिकेटपटू विराट कोहलीला केदारनाथ पूरग्रस्तांच्या मदतनिधीतून ४७ लाख १९ हजार रुपये दिले होते का? हे खरे की खोटे हे स्पष्ट व्हायचे आहे. मात्र भाजप नेत्याने हा आरोप माहितीच्या अधिकाराद्वारे मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे केला असला तरी उत्तराखंड सरकार आणि विराट कोहली यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. उत्तराखंडातील विधानसभेसाठीचे मतदान संपले असून त्यानंतर हा वाद पेटला आहे. विराटला पर्यटन जाहिरातीसाठी सरकारने ही रक्कम दिली होती. तो तेव्हा राज्याचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर होता. विराटचे प्रतिनिधी आणि कॉर्नेस्टोन स्पोर्टस् अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंटचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी सजदेह यांनी असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. या आरोपांबाबत मुख्यमंत्री हरीश रावत यांचे माध्यम सल्लागार सुरेंद कुमार म्हणाले की, पर्यटन राज्याची जीवनरेखा आहे. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी एखाद्या स्टारची निवड करण्यात आली असेल तर त्यात गैर काय आहे? सर्वकाही कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आले असून, आलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. केदारनाथचा पुन्हा विकास करण्यास आमच्या सरकारचे प्राधान्य होते हे जनतेला ठाऊक आहे. भाजप निवडणुकीत पराभूत होत असल्यामुळे चुकीच्या गोष्टी पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोहलीशी संबंधित व्यवहाराबाबत मी संबंधित विभागाकडे माहिती मागविणार आहे. कोहलीला पैसे देण्यात आले होते, असे केवळ भाजपचे म्हणणे आहे. क्रिकेटपटूचे प्रतिनिधी त्यांना कोणताही पैसा मिळाला नव्हता, असे म्हणत आहेत. भाजप नेते अजेंद्र अजय यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून हे प्रकरण उजेडात आणले होते. एक मिनिटाच्या व्हिडिओसाठी विराट कोहलीला जी रक्कम देण्यात आली ती पूर मदतनिधीतूनच देण्यात आली होती. ही रक्कम रुद्रप्रयागच्या आपत्ती निवारण प्राधिकरणामार्फत देण्यात आली होती, तसेच त्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात आली होेती. विराट कोहलीला गायक कैलाश खेर यांच्या कैलाशा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लि.च्या मार्फत हा पैसा देण्यात आला होता, असे नेत्याचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)विराटचे प्रतिनिधी आणि कॉर्नेस्टोन स्पोर्टस् अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंटचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी सजदेह यांनी असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले आहे. केदारनाथवरील व्हिडिओला भाजपचा विरोधभाजपने गेल्या वर्षी गायक कैलास खेर यांना ३ कोटी ६६ लाख रुपये देऊन केदारनाथवर व्हिडिओ तयार करण्यासही विरोध केला होता. भाजपने केदारनाथावरील मालिकेलादेखील विरोध केला होता. मंदिराची कवाडे बंद होत असतानाही ही मालिका प्रसारित करण्यात येणार असल्यामुळे आपण विरोध करीत असल्याचे भाजपने म्हटले होते.