खोबरखेडे यांचा सत्कार
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
शिवर: जय दुर्गा ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवरचे माजी सरपंच रामदास खोबरखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मनोहरराव तोंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून एस.डी. पाटील, पंजाबराव बुरघाटे, डॉ. अरुण येनकर, गजानन देशमुख, रामराव पाटील, रावसाहेब चर्हाटे, दिनकर आडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद मुरुमकार, विश्वास सातारकर, लक्ष्मणराव मुंदोकार, प्रल्हादराव चोपडे, श्रीराम मुरुमकार, मुरलीधर भारसाकळे उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन सुरेश पाटील यांनी केल्याचे प्रसिद्धीप्रमुख देवीदास सासनकर यांनी कळविले आहे. (वार्ताहर)