खापरखेडा... हरीण
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
उपचाराअभावी पाडसाचा मृत्यू
खापरखेडा... हरीण
उपचाराअभावी पाडसाचा मृत्यूखापरखेडा : अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाडसाला वेळीच योग्य उपचार मिळाले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा - कामठी मार्गावर बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. कैलास दौलत कामडी रा. शांतीनगर, नागपूर हे खापरखेडा - कामठी मार्गाने जात असताना त्यांना मार्गात पाडस जखमी अवस्थेत पडले असल्याचे आढळून आले. या पाडसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्याच्या दोन्ही पायाचे हाड मोडल्याने त्याला उभेही होता येत नव्हते. दरम्यान, कैलास कामडी यांनी त्या पाडसाला उचलून लगेच खापरखेडा पेालीस ठाण्यात आणले. त्यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात बघ्यांनी एकच गर्दी केली होती. खापरखेडा पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली. शिवाय पोलीस शिपाई रोशन काळे व अमित उमाठे यांनी या जखमी पाडसाविषयी वन विभागाच्या खापा व नागपूर कार्यालयाला लगेच सूचना दिली. खापा कार्यालयातील वन विभागाचे अधिकारी एस. पुसदेकर यांच्याकडे वाहन नसल्याने ते खापरखेडा पोलीस ठाण्यात तब्बल दोन तास उशिरा पोहोचले. तोपर्यंत ते पाडस उपचाराअभावी गतप्राण झाले होते. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्या पाडसाचा पंचनामा केला आणि मृतदेह सोबत घेऊन गेले. पाडसाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. (प्रतिनिधी)***