शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बहिणाबाई महोत्सवाचे २८ पासून आयोजन रक्षा खडसे : उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा होणार सन्मान

By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)
जळगाव : महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या कार्यकतृत्वाला वाव मिळावा यासाठी २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या दरम्यान सागर पार्क येथे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी उकृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
अजिंठा विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेस भाजयुमोचे दीपक फालक, बहिणाबाई महोत्सवाचे समन्वयक अमेय जोशी उपस्थित होते. महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, या महोत्सवात २५० महिला बचत गटांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १५० महिला बचत गटासाठी प्रवेश राखीव ठेवण्यात येणार आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने बेटी बचाव, बेटी पढाव तसेच शेतकरी आत्महत्या याबाबत संदेश देण्यात येणार आहे. पाच दिवस चालणार्‍या या महोत्सवाला ५० ते ६० हजार नागरिकांची उपस्थिती मिळले असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या महोत्सवाच्या निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव यासाठी काम करणार्‍या मीरा उमप, चंदा तिवारी, निरंजन भागरे, लतिफ खैरा विविध कार्यक्रम सादर करणार आहेत. या दरम्यान महिला बचतगटांना माल विक्री, निर्मिती आणि जाहिरात याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या महोत्सवात २६ शाळा व ९ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी उत्कृष्ट काम करणार्‍या आठ महिलांना बहिणाबाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात मुंबई येथील उद्योजिका कल्पना सरोज, जालना येथील सिताबाई मोहिते, लक्ष्मी ॲग्रोच्या संध्या सूर्यवंशी, तुळजापूर येथील भारतबाई देवकर यांच्यासह अन्य महिलांचा समावेश आहे.

चौकट
चित्राच्या रकमेची शेतकर्‍यांना मदत
बहिणाबाई महोत्सवातंर्गत १४ फेब्रुवारी रोजी बहिणाबाई उद्यानात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. बेटी बचाव, बेटी पढाव, आदर्श गाव, माझा खान्देश, पाणी वाचवा, बहिणाबाई या विषयांवर ही स्पर्धा होईल. या स्पर्धेत मुंबई, पुणे येथील नामांकित चित्रकार सहभागी होणार आहे. स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन बहिणाबाई महोत्सवात लावण्यात येणार आहे. या चित्रांच्या विक्रीतून आलेली रक्कम ही आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या वारसांना मदत स्वरुपात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.