शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाजू मांडण्यासाठी खडसे दिल्लीत!

By admin | Updated: June 10, 2016 05:02 IST

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रीपद गमवावे लागलेले भाजपाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गुरुवारी सायंकाळी येथे दाखल झाले.

प्रमोद गवळी,

नवी दिल्ली- भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रीपद गमवावे लागलेले भाजपाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गुरुवारी सायंकाळी येथे दाखल झाले. ते शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. परदेशदौरा आटोपून मोदी गुरुवारी रात्रीच राजधानीत परतत आहेत. मोदींव्यतिरिक्त खडसे हे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेणार आहेत. खडसे त्यांच्या सून आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्याकडे थांबले असून ते संपूर्ण तयारीनिशी आले आहेत, असे वाटते. त्यांच्यासोबत कागदपत्रांचा मोठा गठ्ठा आहे. आपण मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांना भेटीची वेळ मिळाली नव्हती. लाल दिव्याची गाडी गेल्यामुळे खडसे अस्वस्थ आहेत. त्यांनी ज्या दिवशी पदाचा राजीनामा दिला त्याच दिवशी मोदी परदेश दौऱ्यावर रवाना झाले होते. त्यामुळे खडसे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली नव्हती. आपल्यावर आरोप करणाऱ्यांना आतापर्यंत पुरावे देता आलेले नाहीत. तरीही आपण पदाचा राजीनामा दिला, असे खडसे यांनी राजीनाम्यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस गेल्या आठवड्यात दिल्लीला आले होते व त्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन खडसेंवरील आरोपांबाबतचा अहवाल त्यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. या घडामोडीच्या दुसऱ्या दिवशी खडसेंकडे राजीनामा मागण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शुक्रवारी येथे येणार असल्याचे समजते. मात्र, त्यांच्या दौऱ्याबाबत सकाळीच ठोस काही कळू शकेल.