डेहराडून - गढवाल प्रदेशात झालेल्या हिमवर्षाव व पावसामुळे १६ मेपर्यंत केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. या हिमवृष्टीमुळे केदारनाथ ते बद्रीनाथ हा रस्ता बंद असून १६ मेनंतर तो खुला केला जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले. बद्रीनाथ येथील यात्राही काही काळासाठी बंद करण्यात आली असून, जोशीमठापलीकडे जाऊ नये, अशा सूचना यात्रेकरूंना देण्यात येत आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी हेलिकॉप्टर सेवा १६ मेपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे सुरू होणार नसल्याचे सांगितले.
१६ मेपर्यंत केदारनाथ यात्रा स्थगित
By admin | Updated: May 13, 2014 23:54 IST