शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयभीत नेपाळी सोडतायत काठमांडू

By admin | Updated: April 27, 2015 23:20 IST

शनिवारी आलेल्या विनाशी भूकंपानंतर दोन दिवस पाठोपाठ बसणारे भूकंपाचे धक्के , अन्नधान्य व पाण्याचा तुटवडा यामुळे नेपाळी लोक बेजार व भयभीत झाले

काठमांडू : शनिवारी आलेल्या विनाशी भूकंपानंतर दोन दिवस पाठोपाठ बसणारे भूकंपाचे धक्के , अन्नधान्य व पाण्याचा तुटवडा यामुळे नेपाळी लोक बेजार व भयभीत झाले असून, हजारोंच्या संख्येने लोक काठमांडू शहरातून बाहेर पडत आहेत. काठमांडू शहरातून बाहेर पडण्याचे रस्ते माणसांनी फुलून गेले असूृन, ट्रॅफिक जाम होत आहे. अनेकांच्या हातात लहान मुले आहेत, लोक बस, कार मिळेल त्या मार्गाने काठमांडूबाहेर पडत आहेत. पाणी व वीज यांचा तुटवडा भूकंपग्रस्त भागात पाणी व वीज नाही. वीज व पाणी पुरवणे हे आमच्यासाठी मुख्य आव्हान आहे. त्यापाठोपाठ लोकांना अन्न पुरविले पाहिजे असे गृहमंत्रालयातील अधिकारी लक्ष्मीप्रसाद ढाकल यांनी सांगितले. भारताने औषधे व आपत्ती प्रतिसाद दलाचे सदस्य पाठवले आहेत. चीनने आणीबाणी पथकाचे ६० सदस्य पाठवले आहेत. अमेरिका, ब्रिटन व आॅस्ट्रेलिया यांनी शहरी भागात ढिगाऱ्यातून शोध घेऊ शकणाऱ्या तज्ज्ञांची पथके व औषधे पाठविली आहेत; पण आंतरराष्ट्रीय मदत अद्याप भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचली नाही. कारण भूकंपाच्या पाठोपाठ बसणाऱ्या धक्क्यामुळे काठमांडूचा विमानतळ बंद ठेवावा लागत आहे. ४२०११ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, नेपाळची लोकसंख्या २८ दशलक्ष असून तिथे दर १० हजार नागरिकांसाठी फक्त २.१ डॉक्टर व ५० खाटांचे इस्पितळ आहे. विमानतळावर गर्दी ४काठमांडू विमानतळावर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत असून, नेपाळबाहेर पडण्यासाठी लोक उतावीळ झाले आहेत. शनिवारच्या भूकंपानंतर लोक खुल्या जागेत झोपत आहेत, एक तर लोकांची घरे पडली आहेत किंवा भूकंपाच्या भीतीने घरात जाण्याचे लोकांचे धाडस होत नाही. काठमांडू शहरात व बाहेरच्या भागात लोकांनी रस्त्यावर गाद्या घातल्या आहेत. पाऊस व ऊन यापासून सावली मिळावी म्हणून तंबू उभारले आहेत. बाहेरच्या देशातून येणारे पाणी मिळविण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. काही दुकाने आता उघडत आहेत, पण ती रिकामी आहेत.