शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

काश्मीर धगधगतेच !

By admin | Updated: July 12, 2016 00:53 IST

तीन दिवसांपासून हिंसाचाराचा फटका बसलेले काश्मीर अद्यापही धगधगत असून, सोमवारी सोपोरमध्ये जमावाने पोलीस ठाण्याला पेटवून दिले आणि पुलवामात हवाई दलाच्या विमानतळाला लक्ष्य केले.

श्रीनगर/नवी दिल्ली : तीन दिवसांपासून हिंसाचाराचा फटका बसलेले काश्मीर अद्यापही धगधगत असून, सोमवारी सोपोरमध्ये जमावाने पोलीस ठाण्याला पेटवून दिले आणि पुलवामात हवाई दलाच्या विमानतळाला लक्ष्य केले. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या केंद्रांनाही लक्ष्य करण्यात आले. निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील चकमकी अजूनही सुरूच आहेत. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा शुक्रवारी मृत्यू झाल्यापासून खोऱ्यात २३ जण ठार २५० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. संचारबंदी व फुटीरवाद्यांनी वनीच्या हत्येच्या निषेधार्थ केलेल्या संपामुळे दैनंदिन जीवन सलग चौथ्या दिवशीही विस्कळीत झाले. मोबाईल इंटरनेट सेवा गेल्या शनिवारपासून बंद आहे. दक्षिण काश्मीरमधील पोलीस ठाण्यातून बेपत्ता झालेल्या शस्त्रांचा सुरक्षा दलांना शोध लागलेला नाही. शनिवारी या ठाण्यावर जमावाने हल्ला केल्यानंतर ३५ अ‍ॅसॉर्टेड रायफल्सह अनेक शस्त्रे आणि दारुगोळा बेपत्ता झालेला आहे, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.काश्मीरमधील जीवित हानीबद्दल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र दुख: व्यक्त करून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असे सोमवारी म्हटले.सुरक्षा दले कमालीचा संयम राखून निदर्शकांना ठार मारणे थांबवत नाहीत तोपर्यंत खोऱ्यात शांतता निर्माण होणार नाही, असे ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला सांगितले. राजनाथ सिंह यांनी माझ्याशी संपर्क साधल्यावर मी त्यांना हे सांगितले, असे अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान पाकिस्तानने सोमवारी सकाळी नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. (वृत्तसंस्था)पाकला धक्का : हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी हा काश्मीरमधील चकमकीत ठार झाल्याचा फायदा उघटवण्याचे प्रयत्न पाकने सुरू केले आहेत. काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दले जबरदस्ती करीत असल्याचा आरोप पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केला. बुरहानच्या मृत्युमुळे आम्हाला धक्का बसल्याचे सांगून, त्यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या कारवाईचा निषेध केला. भारतातील अनेक दहशतवादी कृत्यांचा सूत्रधार असलेल्या हफिज सईदने वनीच्या मृत्यूबद्दल प्रार्थना सभा आयोजित केली आहे.काश्मीरमधील अस्थिरता लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सोमवारी येथे परतले. ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबत केनियाच्या दौऱ्यावर होते. खोऱ्यातील परिस्थितीवर उपाय सापडतील, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरनाथ यात्रेकरू अडकले1हिंसाचारामुळे श्रीनगर-जम्मू महामार्ग सलग तिसऱ्या दिवशीही बंद असल्याने शेकडो अमरनाथ यात्रेकरू येथे अडकून पडले आहेत. ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’चा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.2सोनमर्ग भागातील बालटालमार्गे यात्रा केलेले अनेक यात्रेकरू श्रीनगरच्या ‘टुरिस्ट रिसेप्शन सेंटर’मध्ये अडकून पडले आहेत. बालटाल तळ शिबिराहून रात्री एक वाजता निघालेले भाविक पहाटे श्रीनगरमध्ये दाखल झाले. 3‘आम्ही ८ जुलैला शिवलिंगाचे दर्शन घेतले. सोमवारी मध्यरात्री आम्हाला बालटालचे तळ शिबीर सोडण्यास सांगण्यात आले. श्रीनगर येथे तुमच्यासाठी बसची व्यवस्था केली असून, त्या तुम्हाला जम्मूला नेतील, असे सांगितले. मात्र येथे एकही बस नाही. आम्ही तेव्हापासून करीत आहोत. आम्ही कधी जम्मूला पोहोचू, असा प्रश्न बिहारहून आलेले यात्रेकरू प्रमोद कुमार यांनी विचारला. विरोधकांशी चर्चाकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोनिया गांधी, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून खोऱ्यात शांतता आणि सामान्य परिस्थिती निर्माण होण्यासाठीच्या प्रयत्नांवर या दोघांशी चर्चा केली. विरोधी नेत्यांना विश्वासात घेण्याचा हा गृहमंत्र्यांचा प्रयत्न होता. राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा दुसऱ्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना तेथे सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी आवश्यक ते उपाय योजा, असे आदेश दिले.