शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैयाची पुन्हा तिहारमध्ये रवानगी

By admin | Updated: February 27, 2016 04:16 IST

जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पोलिसांनी तिहार तुरुंगातून गुरुवारी रात्री अज्ञातस्थळी हलविल्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्याची तिहार कारागृहात रवानगी

नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पोलिसांनी तिहार तुरुंगातून गुरुवारी रात्री अज्ञातस्थळी हलविल्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्याची तिहार कारागृहात रवानगी केली. तो १२ फेब्रुवारीपासून देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असून, सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. एक दिवसासाठी त्याची कोठडी मागताना दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितले की जेएनयूतील वादग्रस्त कार्यक्रमासंदर्भात अटक झालेले उमर खालिद व अनिर्बन भट्टाचार्य या दोघांच्या व कन्हैयाच्या विधानात विसंगती आहे. त्याचा खुलासा करण्यासाठी कन्हैया व त्या दोघांना समोरासमोर बसवून पुढील तपास आवश्यक आहे.पोलिसांच्या या याचिकेला विरोध करताना कन्हैयाचे वकील म्हणाले की, अटक झालेले दोघे दुसऱ्याच संघटनेशी संबंधित असून, त्यांचा व कन्हैयाचा काही संबंध नाही. शिवाय सुरुवातीचे पाच दिवस कन्हैया पोलीस कोठडीत असताना त्याची चौकशी करण्यास पोलीसांना पुरेसा वेळ मिळाला होता.कन्हैयाचा भाऊ मणिकांतने त्याची गुरुवारी तिहार तुरुंगात भेट घेतली. या भेटीनंतर अतिशय भावनिक होउन तो म्हणाला की, कन्हैया निर्दोष असूनही हायकोर्टात त्याच्या जामीन अर्जाची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात आहे. कोर्टात विविध कारणे सांगून पोलीस त्याला बाहेर येण्यात अटकाव करीत आहेत. त्याला बाहेर येता न आल्यास तो तुरुंगातूनच पी.एच्डी. पूर्ण करेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)जेएनयूच्या माजी प्राध्यापकाकडून पुरस्कार परतजेएनयू प्रकरण हाताळण्यात सरकार आणि पोलिसांनी जे विचित्र प्रकार अवलंबले त्याने व्यथित झालेले जेएनयूचे माजी प्राध्यापक चमनलाल यांनी शुक्रवारी आपला असंतोष व्यक्त केला. विद्यापीठाकडून मिळालेला एक पुरस्कारही परत करीत असल्याची घोषणा त्यांनी केली.