शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

कळमेश्वर...

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा
वेकोलि प्रशासनाचे दुर्लक्ष : बोरगाव (बुजुर्ग) व आदासा येथील ३०० हेक्टर जमीन अधिग्रहित
कळमेश्वर : कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांची ३०० हेक्टर जमीन शासनाने अधिग्रहित केली. परंतु या जमिनीचा शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नसून शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील एक वर्षांपासून रखडलेल्या या समस्येवर अद्यापही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाने मोबदला द्यावा अथवा शेतजमीन विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.
तालुक्यातील जमिनीखाली खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात असून याकरिता तालुक्यातील बोरगाव (बुजुर्ग) परिसरात ३० वर्षांपूवी कोळसा खदान तयार करण्यात आली. या कोळसा खदानीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोळसा उत्खनन करून वेकोलिने खनिज संपत्तीची उचल केली. परंतु या उत्खननामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने या परिसरातील विहिरी संपूर्ण कोरड्या पडल्या. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत होता. यात कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांना सामोरे जात शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट बनत आहे. अशात काही शेतकऱ्यांनी घरची स्थिती लक्षात घेता शेती विकून आलेल्या पैशात कुटुंबाचा गाडा हाकण्याचे स्वप्न बाळगले. मात्र, वेकोलि प्रशासनाने या परिसरातील शेती पुन्हा अधिग्रहित केल्याने त्या शेतीच्या विक्री व्यवहारावर बंदी घातली. परिणामी शेतकऱ्यांपुढे कौटुंबिक कार्य पुढे चालविण्याचा नवा पेच निर्माण झाला आहे.
बोरगाव (बुजुर्ग) येथील १८०.०३ हेक्टर व आदासा येथील १२९.९३ हेक्टर शेतजमीन कोळसा क्षेत्र अर्जन अधिनियम १९५७ ची धारा ७ ची उपधारा १ द्वारा अधिग्रहित करण्यात आली आहे. या कारवाईला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. परंतु अधिग्रहित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. वेकोलि प्रशासन या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
एखाद्या शेतकऱ्याला मुलीच्या लग्नाकरिता किंवा इतर कामासाठी शेती विकायची असली तरीदेखील तो विक्री करू शकत नाही, तर दुसरीकडे वेकोलि प्रशासन मोबदला देत नाही, अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडले आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींही लक्ष देण्यास तयार नाही. (प्रतिनिधी)