शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती कर्णन यांना वेड लागले

By admin | Updated: March 13, 2017 04:26 IST

कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सी. एस. कर्णन यांना ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी रविवारी लिहिलेल्या खुल्या पत्रात ‘वेड लागलेले’ (ल्युनाटिक) म्हटले व या न्यायमुर्तींचे

नवी दिल्ली : कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सी. एस. कर्णन यांना ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी रविवारी लिहिलेल्या खुल्या पत्रात ‘वेड लागलेले’ (ल्युनाटिक) म्हटले व या न्यायमुर्तींचे मानसिक संतुलन गमावलेले आहे, असेही सांगितले.‘‘तुम्ही तुमचे मानसिक संतुलन गमावले आहे हे मला पटलेले आहे,’’ असे जेठमलानी यांनी पत्रात म्हटले. कर्णन यांनी याआधी त्यांच्या (कर्णन) विरोधात अवमान नोटीस जारी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयावर ‘दलितविरोधी’ असल्याचा आरोप केला होता. ‘तुमचे वर्तन हे वेड्यासारखे असून एक दिवस स्वत:ला वाचवण्यासाठी हा वेडेपणाच तुम्हाला ‘बचाव’ म्हणून उपलब्ध असेल अर्थात त्यात यश येण्याची कोणतीही शक्यता नाही’’, असे जेठमलानी यांनी त्यात म्हटले.कर्णन यांना जेठमलानी यांनी तुमचे दावे काढून घ्या, असे आवाहन केले आणि ‘प्रत्येक मुर्खपणाच्या संभाव्य कृत्याबद्दल क्षमा मागण्याची प्रार्थना करा’ असे म्हटले. तुमच्या वेडेपणाचा अघोरीपणाकिती आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला भेटा. मी तुमच्या डोक्यात काही समज घालीन, असे सांगितले. कर्णन यांनी जातीवरून पक्षपात झाल्याच्या केलेल्या दाव्यांचा प्रतिवाद करताना जेठमलानी म्हणाले,‘‘ भ्रष्टाचाराचे प्राबल्य असलेल्या देशात न्यायपालिका हेच एकमेव संरक्षण आहे.’’ जेठमलानी म्हणाले की, ‘‘मी आयुष्यभर मागासवर्गीयांसाठी काम केले आहे परंतु कर्णन हे मागासवर्गीयांच्या हिताचे मोठे नुकसान करण्याचे काम करीत आहेत.’’ ‘‘मागासवर्गासह देशाच्या सेवेशिवाय अन्य कुठलीही काळजी नसलेल्या वृद्धाच्या जाणत्या सल्ल्याचा विचार करा’’, असे राम जेठमलानी त्यात म्हणाले. आठ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्णन यांच्याविरोधात अवमानाची नोटीस जारी केली. कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील अनेक न्यायमुर्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. खंडपीठाने कर्णन यांना आमच्यासमोर १३ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहा, असा आदेश दिला होता. कर्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहून ‘न्यायपालिकेतील उच्च भ्रष्टाचारासंदर्भात’ काही तरी करण्याचे आवाहन केले होते. या पत्रानंतर सर्वोच्च न्यायालयाने कर्णन यांना नोटीस बजावली होती.