वारणा येथे आज कुस्त्यांचे जंगी मैदान
By admin | Updated: December 13, 2014 00:41 IST
वारणानगर : वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व २०व्या पुण्यस्मरणार्थ उद्या, शनिवारी वारणा येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मल्ल युद्ध होत आहे. या मैदानात केसरी किताबाच्या १५ मुख्य कुस्त्यांसह २५० पेक्षा जास्त लहान-मोठ्या लढती रंगणार आहेत.
वारणा येथे आज कुस्त्यांचे जंगी मैदान
वारणानगर : वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व २०व्या पुण्यस्मरणार्थ उद्या, शनिवारी वारणा येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मल्ल युद्ध होत आहे. या मैदानात केसरी किताबाच्या १५ मुख्य कुस्त्यांसह २५० पेक्षा जास्त लहान-मोठ्या लढती रंगणार आहेत.येथील वारणा विद्यालयाच्या पटांगणावर दुपारी एक वाजता या कुस्ती मैदानास प्रारंभ होणार आहे. कुस्ती मैदानाची जय्यत तयारी वारणा उद्योग समूहाने केली असून, आज, शुक्रवारी सायंकाळी माजी मंत्री विनय कोरे यांनी मैदानाची पाहणी केली. यावर्षीच्या मैदानात देशाच्या कानाकोपर्यांतील भारत केसरी किताबासह अन्य केसरी किताबांचे मानकरी लढतीसाठी वारणा येथे येत आहेत. सकाळी भारत केसरी आणि धुमछडी आखाड्याचा रोहित पटेल (इंदौर) सह अन्य मल्ल वारणानगरीत दाखल होत आहेत.जनसुराज्य शक्ती केसरी किताबासाठी रोहित पटेल (इंदौर) विरुद्ध गुरुसाहेब सिंग (पंजाब) यासह रुबलसिंह, हारकेश खली, संग्राम पोळ, संजयकुमार, समाधान घोडके, मनजित, नंदू आबदार यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्त्यांचे मैदान गाजवलेले मल्ल या मातीच्या मैदानात लढत देणार आहेत. तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्राचे वस्ताद प्रकाश पाटील, ईश्वरा पाटील व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)-----------------फोटो ओळ : वारणानगर (ता. पन्हाळा) येथे कुस्तीच्या मैदानाची पाहणी करताना वारणा समूहाचे नेते माजी मंत्री विनय कोरे. शेजारी पदाधिकारी व जनसुराज्य शक्ती किताबासाठी लढत देणारे भारत केसरी रोहित पटेल वि. पंजाब केसरी गुरुसाहेब सिंग.----------------------------