ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ३ - काश्मिरमध्ये पूराचा फटका बसल्यामुळे तेथील नागरिकांची परिस्थिती हलाखीची झालेली असतानाच सरकारने मदतीच्या नावाखाली त्यांची थट्टा केल्याचे समोर आले आहे. पूरग्रस्तांना मदत म्हणून अवघ्या ४७ ते ३७८ रुपयांचा चेक दिल्याचे उघड झाले आहे.
कृषी विभागाच्या अधिका-यांनी जम्मू-वळ असलेल्या सरूरा गावातील शेतक-यांना नुकसानभरपाई म्हणून ४७ ते २७९८ रुपयांपर्यंतचे चेक वाटले. काही शेतक-यांना ५०, ८० तर काहींना ९४ रुपयांचा चेक देण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी नाराज झाले आणि त्यांनी अधिका-यांना जाब विचारला असता केंद्र सरकारकडून एवढीच मदत मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे
संतापलेल्या नागरिकांनी हे चेक सरळ परत केले आहेत.
गेल्या वर्षी काश्मिरमध्ये आलेल्या पूरात सुमारे ३०० नागरिकांना जीव गमवावा लागला होता. पूरामुळे श्रीनगर पूर्णपणे उध्वस्तही झाले होते.