शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

जम्मू-काश्मिरात शिक्षणाचा बोजवारा

By admin | Updated: November 6, 2016 01:09 IST

काश्मिरातील बांदिपोरा जिल्ह्यातील सईदनारा येथे अज्ञात हल्लेखोरांनी एक शाळा जाळली. त्याबरोबर जाळण्यात आलेल्या शाळांची संख्या आता ३२ झाली आहे.

श्रीनगर : काश्मिरातील बांदिपोरा जिल्ह्यातील सईदनारा येथे अज्ञात हल्लेखोरांनी एक शाळा जाळली. त्याबरोबर जाळण्यात आलेल्या शाळांची संख्या आता ३२ झाली आहे. सध्या श्रीनगरमधील दिल्ली पब्लिक स्कूल वगळता एकही शाळा सुरू नाही आणि महाविद्यालयेही बंदच आहेत. सर्व शाळा बंद असतानाच, अतिरेक्यांनी शाळांच्या इमारतींना आग लावण्याचे प्रकार सुरू केले आहेत. काश्मीर खोऱ्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यामुळे पूर्णत: थांबले आहेश्रीनगरच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद शाह अली गिलानी यांचा नातू शिकतो. त्यामुळे त्या शाळेला अतिरेक्यांना हात लावलेला नाही तसेच संचारबंदी व जमावबंदी असली तरी तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही येण्या-जाण्यात अडथळे येत नाहीत. ते सुदैव इतर विद्यार्थ्यांना मात्र नाही.याखेरीज पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यामुळे जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवरील २00 हून अधिक शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. सीमेवरील गावांत व शाळांत तोफगोळे येत आहेत, गोळ्या लागून अनेक जण मृत वा जखमी झाले आहेत. त्यामुळे शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.पोलिसांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यातील सईदनारा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीस काल रात्री आग लागली. अग्निशामक दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तथापि, शाळा वाचू शकली नाही. इमारत पूर्णत: जळून खाक झाली. ८ जुलैपासून सुरू असलेल्या काश्मिरातील हिंसाचारात आजपर्यंत ३२ शाळा जाळण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने या घटनांची स्वत:हून दखल घेऊन सरकारला शाळांची सुरक्षा करण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारनेही राज्य सरकारला लवकरात लवकर शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. (वृत्तसंस्था) चकमकीत अतिरेकी ठारदक्षिण काश्मिरच्या शोपियन भागातील दोबजान गावात उडालेल्या चकमकीत १ अतिरेकी ठार झाला, तसेच एक जवान जखमी झाला. या गावात चार अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा रक्षकांनी नाकेबंदी मोहिमेत गावाला वेढा दिला. एका घरातून अतिरेक्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक अतिरेकी मारला गेला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, चकमक सुरूच होती.मुलाच्या मृत्यूनंतर हिंसाचारश्रीनगर शहरातील इदगाह परिसरात कैसर सोफी (वय १६) नावाच्या एका मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात १२ जण जखमी झाले. त्यातील सहा जण पेलेट गनमुळे जखमी झाले आहेत. सोफी हा २५ आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. सहा दिवसांनंतर शालिमार भागात तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. आज सकाळी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला सुरक्षा दलांनी जबरदस्तीने विषारी पदार्थ खायला लावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याला दफन करण्यात आल्यानंतर जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक केली. त्यातून संघर्ष उडाला.