170 देशांकडून समर्थन : मोदींचे अभिनंदन
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या (युनो) आमसभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असल्याची घोषणा केली असून, भारताने मांडलेला ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. 17क् पेक्षा जास्त देशांनी या ठरावाला समर्थन दिले आहे.
आमसभेचे अध्यक्ष सॅम के कुटेसा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले असून, योगा दिन जाहीर करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. भारतीय पथकाने हा ठराव सादर करण्यासाठी केलेल्या कामाची मी प्रशंसा करतो व पुढील वर्षी हा दिन साजरा करण्याची कल्पना करतो, असे कुटेसा यांनी सांगितले. गेल्या कित्येक शतकांपासून सर्व स्तरातील लोक योगासने करीत आहेत. शरीर व मन या दोन्हीसाठीही ते लाभदायक आहेत, असे कुटेसा यांनी म्हटले आहे. योगामुळे विचार व कृती यांच्यात एकवाक्यता येते, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनीही या ठरावाला मिळालेल्या समर्थनाबद्दल आनंद व्यक्त केला असून, हा दिन साजरा होण्याची मी वाट पाहत आहे, असे म्हटले आहे. योगामुळे लोक एकत्र येतात व त्यातून परस्परांबद्दल आदरही निर्माण होतो, असेही मून म्हणाले.
संपूर्ण जगात शांतता व सलोखा नांदावा अशी आपली इच्छा आहे. योगामुळे समाज एकत्र येईल. व परस्परांबद्दल आदरही निर्माण होतो. योगा हा एक खेळ असून, आणीबाणीच्या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठीही योगा लाभदायक आहे, असे मून यांनी म्हटले आहे.