शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

स्काईपवर सुनावणी अन् ईमेलवर निकाल, मद्रास हायकोर्टाचा नवा आदर्श

By admin | Updated: November 16, 2015 10:06 IST

दिवाळीनिमित्त सुट्टी असलेल्या मद्रास हायकोर्टाने लग्नाच्या प्रकरणातील सुनावणीसाठी चक्क स्काईपचा वापर केला असून निकालही ईमेलवर दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

मद्रास, दि. १६ - दिवाळीनिमित्त सुट्टी असलेल्या मद्रास हायकोर्टाने लग्नाच्या प्रकरणातील सुनावणीसाठी चक्क स्काईपचा वापर केला असून निकालही ईमेलवर दिला आहे. मद्रास हायकोर्टाच्या या टेक्नोसेव्ही सुनावणीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

मद्रासजवळील रामनाथपूरममधील एका चर्चमध्ये लग्नसोहळा पार पडणार होता. मात्र चर्च प्रशासन व लग्न करणा-या तरुणामध्ये वाद झाला होता. हा वाद आयत्यावेळी मद्रास हायकोर्टात पोहोचला होता. चर्चमध्ये लग्न करण्यास परवानगी द्यावी व यासाठी पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी याचिकाकर्त्या तरुणाने केली होती. दिवाळीची सुट्टी असल्याने हायकोर्टातील सर्व न्यायाधीश सुट्टीवर होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हायकोर्टाचे प्रशासकीय न्या. व्ही रामसुब्रमण्यम यांनी मदुरई खंडपीठातील न्या. एस वैद्यनाथन यांना स्काईपव्दारे सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.  यानुसार न्या. वैद्यनाथन यांनी चेन्नईतील निवासस्थानातून स्काईपव्दारे सुनावणी घेतली. कोर्टाने चर्चमध्ये लग्नास परवानगी दिली व लग्नसोहळ्यात पोलिस संरक्षण देण्याचे आदेशही दिले. विशेष बाब म्हणजे या निकालाची प्रत ईमेलव्दारे देण्यात आली. हायकोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्काईपवर सुनावणी झाल्याचे मद्रासमधील कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.