शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सलमानला निर्दोष ठरविणे न्यायाची थट्टा -सरकार

By admin | Updated: February 6, 2016 02:53 IST

भरधाव कारने पदपथावर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी (हिट अ‍ॅण्ड रन) अभिनेता सलमान खान याला निर्दोष ठरविणे म्हणजे न्यायाची थट्टा उडविणे होय

नवी दिल्ली : भरधाव कारने पदपथावर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी (हिट अ‍ॅण्ड रन) अभिनेता सलमान खान याला निर्दोष ठरविणे म्हणजे न्यायाची थट्टा उडविणे होय, या शब्दांत अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली.रोहतगी यांनी २००२ मध्ये गाजलेल्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणाच्या तपासाचा संपूर्ण तपशील जे.एस. खेहार आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाला सादर केला. हा खटला साक्षींवर आधारित असून, सलमानला नोटीस देण्यापूर्वी साक्षींवर विचार करायला हवा, असे सांगत खंडपीठाने पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे. काय म्हणाले, रोहतगीसलमानने मद्यधुंद अवस्थेत लँड क्रुझर गाडी बेदरकारपणे चालवत पदपथावर झोपलेल्या एकाला चिरडले. आपण मद्य पिऊन गाडी चालवायला नको हे त्याला समजायला हवे होते, असे रोहतगी म्हणाले. सलमानचा नव्हे, तर त्याचा चालक कार चालवत होता हे १२ वर्षांनंतर समोर आलेले कथन चुकीचे असून ते मान्य केले जाऊ नये, असेही त्यांनी नमूद केले. मुंबईच्या वांद्रे भागात २८ सप्टेंबर २००२ एका बेकरीबाहेर झोपलेल्या एका इसमाला मद्यधुंद अवस्थेत कार चालवत चिरडल्याबद्दल कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते. सलमान हा दारू पिऊन कार चालवत होता हे नि:संशय पटवता आले नाही, हा आधार मानत उच्च न्यायालयाने त्याची पाच वर्षांची शिक्षा रद्दबातल ठरविली होती. सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील याने सलमानच कार चालवत होता, अशी दिलेली साक्ष तसेच प्रमुख साक्षीदारांच्या साक्षी उच्च न्यायालयाने मान्य केल्या नव्हत्या. रवींद्र पाटील याचे २००७ मध्ये क्षयरोगाने निधन झाले.कनिष्ठ न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष ठरविल्यामुळे सरकारच्या प्रयत्नांना हादरा बसला. २२ जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सलमानला निर्दोष ठरविल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आव्हान देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते.