शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

विमान निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प

By admin | Updated: June 3, 2017 01:31 IST

भारताला रशिया अणुऊर्जा निर्मितीसाठी २५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. भारताच्या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा निर्मितीच्या

सेंट पीटर्सबर्ग : भारताला रशिया अणुऊर्जा निर्मितीसाठी २५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. भारताच्या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा निर्मितीच्या तामिळनाडूतील प्रकल्पाच्या पाच आणि सहा क्रमांकाच्या संच बांधणीचा खर्च ५० हजार कोटी रुपये असून, त्याचा निम्मा भाग रशिया कर्जरूपाने देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात गुरुवारी येथे झालेल्या वार्षिक शिखर भेटीत कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दोन नव्या रिअ‍ॅक्टर्ससाठी उभय देशांत करारावर स्वाक्षरी झाली. या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सात वर्षे लागतील, असे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (एनपीसीआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. के. शर्मा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. संपूर्ण प्रकल्पासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च येणार असून, पहिला संच ६६ महिन्यांनी तर त्यानंतर दुसरा संच सहा महिन्यांनी कार्यान्वित होईल. या रिअ‍ॅक्टर्सची बांधणी रशियाच्या न्यूक्लिअर कॉर्पोरेशनची शाखा रोसॅटोमकडून होईल. या प्रकल्पाचे स्वरूप ७० टक्के कर्ज व ३० टक्के हिस्सा असे असेल, असे शर्मा म्हणाले. रशियाचे सरकार भारताला बांधकामासाठी ४.२ अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज उपलब्ध करून देईल. रशियाचे अत्यंत आधुनिक, विश्वासार्ह तंत्रज्ञान या बांधकामासाठी वापरले जाणार आहे. सेंट पीटर्सबर्ग डिक्लरेशनमध्ये राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक वर्तुळात द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. व्यापारवृद्धीसाठी प्रोत्साहन, त्याच्या रचनेत सुधारणा आणि औद्योगिक सहकार्य विस्तारणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)क्षेपणास्त्र यंत्रणा...भारताला रशिया एस-४०० ट्रायंफ ही विमानविरोधी क्षेपणास्त्र व्यवस्था पुरवण्याची तयारी करीत आहे. दोन्ही देश या विक्री व्यवहाराच्या स्वरूपावर चर्चा करीत आहेत, असे रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री रोगोझिन यांनी म्हटले. एस-४०० विमानविरोधी क्षेपणास्त्र सिस्टीम पुरविण्याच्या कराराच्या आधीची तयारी सध्या सुरू आहे. त्यासाठी नेमका किती वेळ लागेल, हे सांगता येणार नाही. त्यासाठी दोन्ही देशांत करार झालेला असून आम्ही त्यावर आता निव्वळ अटींची चर्चा करीत आहोत, असे रशियाची अधिकृत वृत्तसंस्था ‘तास’ने रोगोझिन यांचा हवाला देऊन म्हटले.उभय देशांत व्यापार आणि आर्थिक करारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून विमाने आणि स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प उभारण्याचे त्यांनी मान्य केले आहे.व्लादिमीर पुतीन यांनी मोदींशी चर्चा केल्यानंतर सांगितले की, ‘‘रशिया आणि भारत यांच्यातील आर्थिक सहकार्य वाढीच्या मार्गावर परतत आहे. हा सकारात्मक कल बळकट करणे हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. आमची चर्चा ही नेहमीच मित्रत्वाच्या वातावरणात व ठोस व उत्पादक झालेली आहे. ही चर्चादेखील त्याला अपवाद नाही.’’