शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

जोगी, कामत यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमध्ये भूकंप

By admin | Updated: June 8, 2016 02:58 IST

काँग्रेसचे नेतेद्वय अजित जोगी आणि गुरुदास कामत यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे पक्षात भूकंप आला आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेतेद्वय अजित जोगी आणि गुरुदास कामत यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे पक्षात भूकंप आला आहे. एकीकडे कामत यांच्याशी चर्चा सुरू असून दुसरीकडे पक्ष अस्तित्वाची लढाई लढत असताना महत्त्वाचे नेते पक्षातून बाहेर का पडत आहेत यावर विचारमंथन सुरू आहे.दरम्यान छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री असलेले अजित जोगी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यावर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्यांची काँग्रेस कार्यकारिणीसोबत इतर पदांवरून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे छत्तीसगडचे प्रभारी व्ही.के. हरिप्रसाद यांनी ही माहिती दिली. पक्षाचे महासचिव असलेले गुरुदास कामत यांच्याबाबत मात्र काँग्रेसने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. कारण त्यांचे मन वळविण्यात येईल असा विश्वास पक्षाला आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उभय नेत्यांनी उपेक्षा सहन न झाल्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मेघालयातही गडबड याआधी झाली वा आता सुरू आहे. परिणामी राहुल गांधी यांनी बऱ्याच काळापासून प्रलंबित संघटनात्मक फेरबदलाच्या प्रक्रियेला वेग दिला आहे.पक्षाचे महासचिवही बदलले जाणार असून राहुल गांधी यांचे निकटस्थ मानले जाणारे राजू, जितीनप्रसाद, भँवर जीतेंद्र सिंग यांच्यासारख्या तरुण नेत्यांना नव्या चमूत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याची तयारी सुरू आहे.