शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘झिका’ लसीचा सर्वप्रथम भारतात शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 04:30 IST

डासांपासून संक्रमित होणाऱ्या जीवघेण्या ‘झिका व्हायरस’वर जगात सर्वप्रथम लस शोधून त्याचे पेटंटही नोंदवल्याचा दावा हैदराबादच्या एका संस्थेने केला. या लसीची चाचणी घेण्यास थोडा अवधी लागेल

नवी दिल्ली : डासांपासून संक्रमित होणाऱ्या जीवघेण्या ‘झिका व्हायरस’वर जगात सर्वप्रथम लस शोधून त्याचे पेटंटही नोंदवल्याचा दावा हैदराबादच्या एका संस्थेने केला. या लसीची चाचणी घेण्यास थोडा अवधी लागेल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘झिका’बाबत भारताला सतर्कतेचे निर्देश जारी केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभर दिशानिर्देश जारी केले. गरोदर महिलांना या आजाराच्या संभाव्य संक्रमण क्षेत्रात प्रवास टाळण्याची सूचना करण्यात आली आहे. ‘झिका’वरील उपचाराचे पेटंट ९ महिन्यांपूर्वीच आम्ही नोंदवले. ही लस तयार करण्यास इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) अधिकृतरीत्या भारतात ‘झिका व्हायरस’ मागविले व त्यावर आम्ही संशोधन केले, असे हैदराबादच्या ‘भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले. ते म्हणाले, संस्थेने दोन प्रकारची ‘झिका लस’ तयार केली आहे. माणसांवर व प्राण्यांवर त्याचे प्रयोग करण्यास आणखी वेळ लागेल. तथापि अवघ्या ४ महिन्यांत १० लाख झिका लस बनवण्यास संस्था समर्थ आहे. (विशेष प्रतिनिधी)भारतात मोठ्या संख्येने असलेले ‘एडीस एजिप्टी’ प्रकारचे डास डेंग्यू पसरवतात. तेच ‘झिका व्हायरस’चा प्रसार करण्यास कारणीभूत ठरू शकतात. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालकांच्या देखरेखीखाली ‘आयसीएमआर’ला विषाणू संशोधनाच्या प्राथमिकतेसह तातडीने आवश्यक सर्व उपाययोजनांचे आदेश दिले आहेत.आम्ही या लसीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करीत असून तिचा वापर करण्याची शक्यता पडताळत आहोत. हे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत उत्पादनाचे चांगले उदाहरण आहे.- डॉ. सोमय्या स्वामीनाथन, आयसीएमआरचे संचालक